साई संस्थानच्या परीपत्रकाने कामगारानंमध्ये मोठी खळबळ.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी :------ शिर्डी श्री साईबाबा मंदिर परिसरात कुणीही व्हीव्हीआयपी, व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यानंतर कायम किंवा कंत्राटी कामगार या लोकांबरोबर फिरताना दिसतात.त्यामुळे अडचणी निर्माण होतात .त्या धर्तीवर या पुढे संस्थांनचे कायम किंवा कंत्राटी कामगार यांनी कामाव्यतिरिक्त सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी यांच्याबरोबर श्री साई मंदिर किंवा परिसरात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर व त्यांच्या विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश श्री साईबाबा संस्थान चे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले आहे.
नुकतेच परिपत्रका काढले आहे, यात म्हटले आहे की, श्री साई दर्शनाला देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी, व्हीआयपी सेलिब्रिटी येत असतात. ते आल्यानंतर काही संस्थांनचे कायम ,कर्मचारी, कायम कंत्राटी व ठेकेदार कडील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचारी हे नेहमी व्हीआयपी, बरोबर सेलिब्रिटींबरोबर फिरताना आढळून आले आहे तसेच . फोटोसेशन करतात. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात ,त्यामुळे संस्थानला या सेलिब्रिटीच्यी बंदोबस्तात अडचण येते, यापुढे असे कुणी करू नये .संस्थांनचे कायम किंवा कायम कंत्राटी किंवा ठेकेदाराकडील कंत्राटी कामगार, आऊटसोर्सिंग कामगार यापैकी कुणीही आपल्या ड्युटी काळात, ड्युटी व्यतिरिक्त श्री साईबाबा संस्थान परिसरात किंवा मंदिरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटींबरोबर फिरू नये अन्यथा त्यांच्यावर व त्यांच्या विभाग प्रमुखांवरही कारवाई करण्यात येईल. जर अत्यावश्यक व्हीआयपी किंवा जवळचा सेलिब्रिटी असेल व त्यांच्या बरोबर जायचे असेल तर उपकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊनच मग जावे. उपकार्यकारी अधिकारी उपलब्ध नसतील तर मुख्य लेखाधिकारी यांची परवानगी घेऊनच जावे. अन्यथा जाऊ नये. आपल्या ड्युटी व्यतिरिक्त संस्थान परिसरात जर आवश्यकता असेल तर उपकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही या आदेशात दिला आहे, या मुळे संस्थांनच्या अनेक कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, त्यामुळे आता कोणीही व्यक्ती किंवा सेलिब्रिटी आला तर संस्थांनच्या कर्मचारी किंवा अनेक नेहमी वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी अडचण निर्माण झाली आहे. फोटोसेशन करुन त्यांचे फोटो व्हायरल करता येणार नाही, अशी परिस्थिती यापुढे निर्माण होणार आहे. साई दर्शनासाठी ग्रामस्थांना नियामावली साईभक्त ड्रेस कोड पत्रकासाठी नियमावली व आता कामगारांसाठी निघालेल्या परीपत्रकामुळे खळबळ उडाली असलीतरी साईबाबा संस्थान मध्ये कामगार हितासाठी तीन संघटना आहे त्यानी मौन सोडले पाहिजे असा सुर पुढे आला आहे
0 Comments