Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरव - श्री. अमित कोल्हे.

 संजीवनी  फार्मसी महाविद्यालयाचा ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरव  - श्री. अमित कोल्हे.

     भारतीय उद्योग परिसंघाकडून (सीआयआय) संजीवनीची दखल.                                           कोपरगांव प्रतिनिधी :------ संजीवनी काॅलेज ऑफ  फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड  रिसर्च या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या  संस्थेला काॅन्फडरेशन ऑफ  इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय-भारतिय उद्योग परिसंघ) या १२५ वर्षांपासून  उद्योग जगतासाठी कार्य करीत असलेल्या संस्थेने ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरवीले आहे. उद्योग जगताप्रती दिलेल्या योगदानाबध्दल व करीत असलेल्या कार्याची पुराव्यानिशी  दखल घेवुन सीआयआयने जाहिर केलेला  संजीवनीला देश पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार दिला आहे, या पुरस्काराने संजीवनीने एक नवीन किर्तीमान स्थापित केले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रप ऑफ इइन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलीर आहे. 
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की देशात सुमारे १७०० सरकारी व खाजगी बी. फार्मसी संस्था आहेत. यातील फक्त २७  फार्मसी संस्थांना सीआयआयने प्लॅटीनम पुरस्काराने गौरविले आहे. यात संजीवनी सारख्या ग्रामिण भागातील संस्थेचा समावेश  आहे. मागील सात  वर्षांपासून  सीआयआय या संस्थेमार्फत आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (एआयसीटीई), नवी दिल्लीची मंजुरी प्राप्त इंजिनिअरींग, फार्मसी, मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर संस्थांची देशातील इंडस्ट्रीज प्रती असलेल्या योगदान व समन्वयाबाबत दखल घेवुन सीआयआयच्या कसोट्यांमध्ये  उतरलेल्या संस्थांना प्लॅटीनम, गोल्ड आणि सिल्वर वर्गवारीमध्ये पुरस्कार जाहिर केले जातात. त्यासाठी सीआयआयच्या ऑनलाईन  पोर्टल वर मागविलेल्या माहितीमध्ये इंडस्ट्रीशी असलेला सहयोग (कोलॅबोरेशन), इंडस्ट्रीने विध्यार्थ्यांसाठी प्रायोजीत केलेले प्रोजेक्टस्, विध्यार्थी व शिक्षकांनी केलेले औद्योगीक प्रशिक्षण, इंडस्ट्रीज मधिल तज्ञ व्यक्तींची विध्यार्थ्यांसाठी  आयोजीत केलेली व्याख्याने, शिक्षण  संस्था आणि उद्योग जगतामधिल असलेले आधुनिक ज्ञानातील अंतर कमी करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न, उद्योग जगतासाठी पुरविण्यात येणारे मनुष्यबळ , कन्सलटन्सी, अशा  अनेक बाबींची पुराव्यानिशे  माहिती संजीवनी फार्मसीच्या इंडस्ट्री इन्स्टिटयूट  इंटरॅक्षन सेल मार्फत भरण्यात आली. या सर्व बाबींची सीआयआयने खातरजमा केली आणि संजीनवी फार्मसी महाविद्यालयाला प्लॅटीनम पुरस्कार जाहिर करून देशातील २७ सर्वोत्कृष्ट ट महाविद्यालयात संजीवनी असल्याचे शि क्कामोर्तब केले. 
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून प्राचार्य डाॅ. किशोर  साळुंखे, डाॅ. सरीता पवार, प्रा. गिरीश काशीद  यांचेसह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


Virus-free. www.avg.com

Post a Comment

0 Comments