आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.६ मध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा.

  कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.६ मध्ये राष्ट्रीय  मतदार दिन उत्साहात साजरा.  

कोपरगाव प्रतिनिधी :---  २५ जानेवारी हा सर्वत्र राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.मतदार दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध  कार्यक्रम साजरे केले जातात.२०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. २५ जानेवारी १९५० ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.जगातील सर्वात यशस्वी लोकशाही  म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते.हि लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरीकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे.कारण मतदारच आपल्या मतदानाद्वारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात.

       नवमतदारांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून नगरपालिका शाळा क्र.६ मध्ये 'राष्ट्रीय मतदार दिन'विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रथम शाळेतील पालक व नवमतदारांना आंमत्रीत करण्यात आले होते.जानेवारी महिन्यात मकरसंक्रात हा सण कोपरगावात तीळगुळाबरोबर पतंग उडवून साजरा केला जातो.याचे औचित्य साधून आलेल्या मतदारांना छोट्या आकारातील पतंगरुपी मतदान जनजागृतीचे शुभेच्छासंदेश असणारे कार्ड भेट देण्यात आले.आलेल्या मतदारांना मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली.ज्या मतदारांनी नवीन कार्डासाठी नावनोंदणी केली होती.त्या मतदारांना आलेल्या मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी नगरपालिका शाळा क्र.६ चे मुख्याध्यापक श्री. भरत आगळे सर , सविता साळुंके,कल्पना निंबाळकर,निर्मला बनसोडे, कुर्हाडे मावशी,वनछैय्या भाऊ,बीएलओ असणाऱ्या श्रीम.सुनिता इंगळे,आरती कोरडकर,अरुण पगारे सर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments