आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते कोपरगावच्या सुनिता इंगळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

  शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते कोपरगावच्या  सुनिता इंगळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान





कोपरगाव प्रतिनिधी :------ महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका संघ यांच्या वतीने लोणावळा पुणे येथे रायस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार नगरपालिका शाळा क्र,६ च्या शिक्षिका श्रीम.सुनिता इंगळे यांना 

शालेय शिक्षणमंत्री मा. नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते लोणावळा या ठिकाणी प्रदान करण्यात आला.श्रीम.सुनिता इंगळे यांचे नाव संघटनेने ५ सप्टेंबर रोजीच जाहिर केले होते पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या परीस्थीतीमुळे हा सन्मान सोहळा ४ जानेवारी रोजी घेण्यात आला.

    विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, ज्ञानसंस्कार या शैक्षणिक ब्लॉग ची निर्मिती , शैक्षणिक  व्हिडिओ -पीडीएफ निर्मिती , क्यू आर कोड निर्मिती ,दिव्यांगाचे शिक्षण ,कोरोना काळात गरजूंना शालेय साहित्य वाटप ,कोरोना काळात ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण, विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभाग, राज्य व तालुकास्तर तज्ञ सुलभक, बालरक्षक , मोबाइल व शैक्षणिक मित्र,टाकाऊतून शैक्षणिक साहित्य निर्मिती इत्यादी सह अन्य शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री मा. नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते व मा. श्री. अर्जुन कोळी सर, मा. आमदार श्री. संजय जगताप, श्री. सुनील शेळके, मा. शिक्षणसंचालक श्री. दत्तात्रेय जगताप, मा. श्री. उपसंचालक श्री. औदुंबर उकिरडे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

या प्रसंगी त्यांचे पती श्री. नवनाथ सूर्यवंशी हे उपस्थित होते.

याप्रसंगी मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांचे कौतुक केले. देशाचे भविष्य घडविण्याचे मोलाचे काम शिक्षक करतात. कोरोना काळात शिक्षकांनी सहकार्य केले म्हणून महाराष्ट्रात आज ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. नपा व मनपा शिक्षकांच्या बदल्यांसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीम. सुनिता इंगळे  यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षक, पालक व सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments