आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

डंपर चोरणाऱी टोळी पोलिसांनी केली जेरबंद.

 डंपर चोरणाऱी टोळी  तालुका पोलिसांनी केली जेरबंद.


कोपरगाव प्रतिनिधी :---  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथील दादा शहाजी रोहमारे यांच्या पेट्रोल   पंपा वरुण २जानेवारी रोजी दुपारी तीन - साडेतीन वाजेच्या दरम्यान  डंपर क्रमांक एम. एच. २४- जे. ७००८ (दहा लाख कींमतीचा) चोरीला गेल्याची घटना घडली होती त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सतीश पुरुषोत्तम देशमुख  रा. गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर १५/२०२१ भा.द. वी. कलम,३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. गुन्हांचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. दौलत जाधव यांनी तपासाचे चक्रे फिरवून २१जानेवारी रोजी तालुक्यातील भोजडे येथे राहत असलेल्या संशयित राहुल कैलास। घनघाव याला ताब्यात घेतले व डंपर चोरी बाबतीत विच्यारणा केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली यामध्ये त्याला आरोपी पप्पू रमेश काटे रा.धोत्रे, रोहित संजय घाटे रा.भोजडे, अशोक अर्जुन आहेर रा. भोजडे यांच्या मदतीने   डंपर क्रमांक एम. एच. २४- जे. ७००८  हा चोरून नेवून तो फिरोज मन्सूर शेख.रा.मेहूनबारे ता.चाळीसगाव जिल्हा जळगांव यांस विकला त्यानंतर पोलिसांनी डंपंर चाळीसगांव येथून ताब्यात घेवून डंपर खरेदी करणारा फििरोज शेख याला मेहुन बारे येथून अटक करण्यात आली असून वरील सर्वांना कोर्टात हजर केले असता त्यांना २५ जानेवारी पर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच ह्या अरोपींनी आजून किती चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलिस घेत आहे. 

       ह्या कारवाई मध्ये  पो.नि दौलत जाधव, पो.स.ई.सचीन इंगळे, पो.हे काँ.इरफान शेख, पो.हे.काँ.अर्जुन बाबर,पो.काँ. जयदीप गवारे  यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments