तांडेल बंगला कॉर्नर सुशोभित करण्याची मागणी.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव शहरातील तांडेल बंगला जवळील कॉर्नर सुशोभित करण्याची मागणी कोपरगाव शहरातील भारतीय जनता (वसंत स्मृती कार्यालय)पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवेदनाद्वारे केली आहे त्यात म्हटले आहे की,.कोपरगाव शहरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दृष्टीस पडणाऱ्या तांडेल बंगला व बंगल्यालगतचा असणारा पूर्वीच्या होडीचा धक्का हा कोपरगाव चा इतिहास सांगणारा धक्का आहे. फार पूर्वी गोदावरी नदी सतत वाहत असताना दोन्ही तीरावर जाण्यासाठी होडीचा वापर होतं असे त्याला होडीचा धक्का म्हणून संबोधण्यात येत असे. सध्याच्या ठिकाणी भगवा ध्वज हा डौलाने फडकत आहे याठिकाणी होडीची प्रतिकृती काढून हा परिसर लवकरात लवकर सुशोभित करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपाचे ( वसंत स्मृती कार्यालय) विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, प्राध्यापक सुभाष शिंदे, मनोहर कृष्णानी, राजेंद्र खैरे, विनीत वाडेकर विजय बडजाते किरण थोरात संजय कांबळे बाळासाहेब कुलकर्णी, गणेश शिंदे, चेतन राणे आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत
0 Comments