विमानाने येणाऱ्या साईभक्तांची कोरोणो तपासणी
उशिरा होत असल्याने शिर्डी शहरात चिंता.
![]() |
![]() |
शिर्डी/ प्रतिनिधी :----- श्री साईबाबा मुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र झाले असून येथे देश-विदेशातून साईभक्त मोठ्या प्रमाणात श्री साईदर्शनासाठी येत असतात, त्यामध्ये विमानाने येणाऱ्या साईभक्तांची, प्रवाशांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे देशातील प्रत्येक विमानतळावर कोरोणाची टेस्ट केली जाते ,शिर्डी विमानतळावरही ती संगमनेर येथील स्वामी कृपा क्लिनिक लॅबोरेटरी या द्वारे केली जाते, शिर्डीसाठी असणारे काकडी येथील श्री साईबाबा विमानतळावर विमानाने आलेल्या साईभक्त प्रवाशांची RTPCR कोरोणा तपासणी केली जाते, मात्र या तपासणीचा अहवाल येण्या अगोदरच किंवा कळण्या आगोदरच साईभक्त, प्रवासी शिर्डी मध्ये श्री साई दर्शनासाठी येत असतात ,त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता येथे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून शिर्डी विमानतळावर विमानाने आलेल्या साईभक्तांची कोरोणा तपासणी करणाऱ्या संगमनेर येथिल स्वामी कृपा क्लिनिक लबोरेटरी या संस्थेला रॅपिड टेस्ट करण्यास सक्तीचे करावे, तसेच कोरोना तपासणीचा अहवाल न देता विमानाने येणारा साईभक्तांना शिर्डीकडे सोडण्याची सवलत देणे हे कितपत योग्य आहे, त्यामुळे विमानतळावर आलेल्या साई भक्तांची RTPCR चाचणी न करता रॅपिड टेस्ट करण्याची मागणी त्यांनी होत आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,शिर्डी हे साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे देशातील कानाकोपर्यातून साईभक्त मोठ्या प्रमाणात येत आहेत, श्री साई मंदिर खुले झाल्यानंतर येथे साईभक्त दर्शनासाठी येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशातील विमान सेवाही सुरू असल्यामुळे व शिर्डी विमानतळ सुरू झाल्यामुळे येथे दिल्ली हैदराबाद बंगलोर अदी ठिकाणाहून विमाने येत असतात, या विमानाने दररोज अनेक साईभक्त प्रवासीही शिर्डीत येत असतात, मात्र शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची कोरोनाची RTPCR तपासणी संगमनेर येथिल स्वामी कृपा क्लिनिक लेबोरेटरी या वैद्यकिय संस्थेमार्फत केली जाते, एका व्यक्तीला या कोरोणा तपासणीसाठी 980 रुपये आकारले जातात,प्रत्येकी 980 रुपये फी घेऊन कोरोना तपासणी करून मात्र तिचा अहवाल तत्काळ दिला जात नाही, त्यांचा अहवाल ते शिर्डीत आल्यानंतर 10 ते 12 तासांनी किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळेनंतर त्यांच्या मोबाईल वर मॅसेज द्वारे पाठवलं जातो,तसे पाहता त्यांना अहवाल येईपर्यंत विलागिकरण कक्षात ठेवले जात नाही, त्यांना शिर्डीकडे किंवा इतर ठिकाणी जाण्यास किंवा विमानतळाआतून बाहेर पडण्यास मुभा दिली जाते, त्यामुळे जर विमानातुन येणारा एखादा प्रवासी कोरोना बाधित असला तर त्यामुळे शिर्डीत ही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो,ब्रिटन मध्ये कोरोणाचा नवीन स्टेन आलेला असून त्याचे मुंबई व महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे असा कोरोणा बाधित रुग्ण जर विमानाने शिर्डीत आला तर त्याचा प्रादुर्भाव शिर्डीत वाढू शकतो ,मात्र याचा विचार न करता शिर्डी विमानतळावर हि कोरोना तपासणी करणारी स्वामीकृपा कोरोना लॅबरोटरी प्रत्येकी 980 रुपये घेऊन तपासणी करुन अहवाल न देता अशा साईभक्तांना थेट विमानतळाबाहेर पडण्यास सवलत देतात,या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात शिर्डीला कोरोणा चा धोका निर्माण झाला असून या शिर्डी विमानतळावर ही कोरोना तपासणी करणार्या या स्वामी कृपा क्लिनिक लॅबोरेटरीने बाहेर शहरातून विमानातुन येणाऱ्या साई भक्त व प्रवाशांची रॅपिड टेस्ट करून त्यांना झटपट अहवाल देऊन विमानतळाबाहेर सोडण्यात यावे ,जेणेकरून साईभक्तांचा वेळही जाणार नाही व कोरोणाची तपासणीही व्यवस्थित होईल, अशी मागणी साई भक्त व शिर्डी कर करत आहेत,
0 Comments