आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा :---माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील

नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा :---माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील   

ठरवले तर कोपरगाव एक महिन्यात धुळमुक्त होईल.                              





कोपरगाव प्रतिनिधी :-----   कोपरगाव शहराची रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून  धुळीचे मोठे साम्राज्य सर्वत्र पसरल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नी नगरपालिका जातीने लक्ष घालीत नाही असा परखड सवाल माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक संदर्भ  आहेत  शैक्षणिक हब मोठ्या प्रमाणात  येथे आहे पालिकेच्या माध्यमातून  या सुधारणा जर सातत्याने चालू ठेवल्या  तर कोपरगाव हे मुख्यालय होऊ शकते .नगरपालिकेने ठरवले तर एक महिन्याच्या आत रस्ते धूळ मुक्त होऊ शकतात असेही ते म्हणाले श्री पाटील पुढे म्हणाले आज शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश केला असता प्रत्येक रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य धुळीमुळे डोळ्यांचे आजार श्वसन विकार मणक्यांचे आजार खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे होणारे नुकसान यामुळे जनता पुरती वैतागली आहे नगरपालिकेला विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे रस्त्यांच्या निविदा ही  काढल्या आहेत मात्र निष्क्रिय नियोजन असल्यामुळे रस्ते होण्यास तयार नाहीत रस्त्याच्या बाजूला महिनोन्महिने पडलेली खडीचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे नगराध्यक्ष वहाडणे सांगतात निविदा निघाल्या आहेत लवकरच कामाला सुरुवात होईल मग कामे का सुरू होत नाही असा सवाल करून प्रशासन व  अधिकाऱ्यांत  ताळमेळ नाही  पैसे असतांना देखील रस्ते का होत नाही रस्ते जर चांगले झाले तर शहराचा कायापालट होऊन व्यापारवृद्धी निश्चितपणे होऊ शकेल मात्र नगरपालिका हे जाणून बुजून करत नसल्याचा आरोप पाटील यांनी करून रस्त्यावर टॅंकरद्वारे पाणी मारण्यात येते मात्र ती तात्पुरती मलमपट्टी आहे रस्त्यावर पाणी मारू नये असे आपले परखड मत असून दरवर्षी डांबरीकरण करून रस्ते तयार करावे त्याचे टेंडर काढावे हे सर्व शक्य आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे नद्या तुडुंब भरलेले आहेत असे असतानाही नगरपालिका सात दिवसा आड हिवाळ्यातच पाणीपुरवठा करीत आहे नागरिकही का गप्प बसले आहेत नागरिकांना आरोग्य रस्ते व पाणी या आवश्यक बाबी असताना यावरच भर दिला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल गोदावरी लहान पूल ओलांडला व मुख्य रस्त्यावरून थेट साईबाबा चौफुली पर्यंत जायचे झाले तरी मोठे स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहनांमुळे उडणारी धूळ असेच काहीसे चित्र निवारा रोड गांधिनगर बैल बाजार गुरुद्वारा रोड इंदिरा पथ धारणगाव रोड व इतर रस्तेही तूट फुट  झालेले आहेत त्यातच खाजगी दूरसंचार वाहिन्यांच्या खोदाईमुळे आहे ते रस्ते खराब होत आहेत या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही अथवा नगरपालिका प्रशासन त्याबाबत तातडीने पावले उचलण्यास धजत नाही सर्वसामान्य नागरिक घरपट्टी पाणीपट्टी शैक्षणिक तसेच झाडे लावण्या संदर्भात कररूपाने पैसा भरतो मात्र त्याचा विनियोग चांगला होत नसल्याचे दिसत आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात मात्र रस्ते व इतर गल्लीबोळात झाल्यानंतर सदरची धूळ ही आजूबाजूला लावून देण्यात येते हीच धूळ दररोज उचलली लांब नेऊन टाकली तर धुळीच्या प्रमाणात बराचसा फरक पडू शकेल नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही श्री पाटील यांनी केली मी काही महिने नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आहे त्यामुळे मला या सर्वसामान्य प्रश्नांची जाण आहे त्यामुळेच मी पालिका प्रशासनाला याप्रश्नी सातत्याने जबाबदार धरीत आहे सामाजिक दृष्टिकोन ठेवून कोणतेही राजकारण न करता मीही मागणी करीत आहे नेत्यांनी त्यांच्या परीने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचा विनियोग चांगली कामे करून दाखवण्यात घालवावा असा सल्लाही श्री पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला .                                        


 शहरातील धारणगाव रस्त्यावर डांबरीकरण करणे ऐवजी त्यावर मुरूम टाकणारी राज्यातील एकमेव नगरपालिका असल्याची टीका श्री पाटील यांनी करून त्यांच्या सुरू असलेल्या कारभारा चे चांगलेच वाभाडे काढल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू आह

Post a Comment

0 Comments