के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या कु. काजल बाजीराव पदाडे हिला सुवर्णपदक.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :----- के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विज्ञान शाखेतील पदार्थ विज्ञान (भौतिकशास्त्र) वर्गातील कु. काजल बाजीराव पदाडे या विद्यार्थिनीस एप्रिल / मे २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये सुर्वणपदक प्राप्त झाले आहे. सदर पुरस्कर हा श्री. पुरुषोत्तम नारायण भोगाटे सुवर्णपदक, कै. प्राचार्य रॅंग्लर गोपीकृष्णन लक्ष्मण चंद्रात्रे सुवर्ण पदक व विद्यावाचस्पती अभ्यंकर यांच्या नावाने पदार्थ विज्ञान या विषयातून प्रथम येणा.या विद्यार्थ्यास दरवर्षी दिला जातो. सदर पुरस्कार मिळाल्याचे अधिकृत पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव व पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ. बी.बी. भोसले यांनी येथे दिली.
प्राचार्य डॉ. यादव पुढे म्हणाले की, “१९९२ मध्ये के. जे. सोमैया महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर विज्ञान शाखा सुरु झाली होती. तेव्हापासून विज्ञान शाखा सातत्याने विकसित झाली असून विज्ञान शाखेला या रूपाने प्रथमच सुवर्ण पदक प्राप्त झाले आहेत, ही महाविद्यालय व संस्थेच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. विज्ञान शाखा सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करून तालुक्यात नावलौकिक मिळवित असून ही बाब अत्यंत समाधान देणारी आहे. यापूर्वीही पदार्थविज्ञान विभागातील तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले होते. सदर विद्यार्थिनी सोमठाणे तालुका सिन्नर येथील शेतकरी कुटुंबातील असल्याने तिचे हे यश अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे.
ही सुवर्णपदके मिळाल्याबद्दल कु. काजल पदाडे हिचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव तसेच विभाग प्रमुख डॉ. बी.बी. भोसले व त्यांच्या विभागातील डॉ. आर. के. कोल्हे व सर्व सहकारी प्राध्यापकांनी सदर विद्यार्थीनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात कोपरगाव सारख्या महाविद्यालयाने प्राप्त केलेले हे यश उल्लेखनीय असून सदर विद्यार्थिनीला व तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे सर्वत्र कौतुक होत आहे
0 Comments