आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राष्ट्रवादीचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ही फक्त नौटंकी:---- पराग संधान.

 राष्ट्रवादीचे  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ही फक्त नौटंकी:----  पराग संधान.





कोपरगाव प्रतिनिधी :----  राष्ट्रवादी  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ही फक्त नौटंकी असल्याची टीका  पराग संधान यांनी  गुरवार १४ जानेवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. याबाबत अधिक बोलताना पराग संधान म्हणाले की,

 २८ कामांचे टेंडर काढले असताना त्यातील  १२ च कामांसाठी विरोधक एवढे आग्रही का ? मग इतर १६ कामाबाबत गप्प का ?  हा दुजाभाव कशासाठी ? असा सवाल करत मुळात आम्ही शहर विकासाला विरोध केलाच नाही

स्थायी समितीच्या  बैठकीत २८ पैकी १२  निविदा मंजुरीसाठी आल्या तर उर्वरित १६ निविदा  मंजुरीसाठी का आल्या नाहीत  या प्रश्नाचे उत्तर नगराध्यक्ष व प्रशासन  देऊ शकले नाही तसेच सदर निविदांची अंदाजपत्रकीय रक्कम खूप जास्त असल्याचे निदर्शनास आले तसेच शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली असताना त्या रस्त्यांचा समावेश नाही जे रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत त्याच रस्त्यांच्या निविदा होत्या आम्ही एक मुख्य रस्ता सुचवला त्याचा समावेश निवेदन करण्याची मागणी केली परंतु ही मागणी नगराध्यक्षांनी व प्रशासनाने मान्य केली नाही विशेष म्हणजे आमच्या लक्षात आले की निविदेमध्ये काही ठराविक नगरसेवकासाठी काही ठराविक रस्त्यांचा समावेश करण्यात आला  त्या  विकासकामांच्या निविदा नामंजूर केल्यामुळे आता सर्वपक्षीयांच्या नावाखाली  विरोधक राष्ट्रवादीकडून  कळीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. असा आरोप सत्ताधारी सेना-भाजप नगरसेवकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला कोनपाच्या तिजोरीतील खडखडाटामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी केलेल्या ठेवीच्या  पावत्या मोड करून नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने  नगरपालिका फंडातून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.  जनतेच्या पैशाची उधळपट्टी होवू नये, अशी आमची अपेक्षा आहे.  नगरपालिकेत आमदार काळे गट नगराध्यक्ष वहाडणे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या तिघांची सहमती एक्सप्रेस जोरदारपणे सुरू असून गेले दिड वर्षापासून नगरपालिकेकडे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्त च्या प्रती व  शहरात सुरू असलेल्या विविध कामाबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली असताना नगराध्यक्ष व प्रशासनाकडून ती देण्यास टाळाटाळ होत होत आहे याचा अर्थ सत्ताधारी सेना-भाजपला  धुडकावून लावण्याचे धोरण आहे काय, ज्या गोकुळ नगरी करता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ३७ लाख रुपयांचा निधी दिला. त्यांची साधी कोनशिला ही नगरपालिकेने आजपर्यंत लावलेली नाही,अशा शब्दात सेना-भाजप नगरसेवकांनी  नगराध्यक्ष व प्रशासनावर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा  धूळ मुक्ती सल्ल्याची दखल घ्या, खेळाचे मैदान व परेड ग्राउंड ची जागा मालकाला  देण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप पराग संधान यांनी केला.  शहरातील मोकळी मैदाने आणि खेळाची मैदाने टिकविण्याचे मोठे आव्हान असताना  आरक्षणे काढून  काही भूखंड धनिकांच्या घशात घातले जात आहेत.पालिकेत टक्केवारी खाण्याची परंपरा निर्माण झाल्यामुळे हे शहर बकाल बनले आहे, सत्ताधारी नगराध्यक्षांचा कारभार बोगस पद्धतीने सुरू असून वहाडणे हेच शहर विकासाला गेल्या चार वर्षापासून खोडे घालीत आले आहेत. असा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला  धरणे तुडुंब भरलेली तरीही  कोपरगाव शहराला सात दिवसात पाणी ही बाब अतिशय निंदनीय असून त्या  प्रश्नी मात्र आमदार अथवा त्यांचे नगरसेवक बोलण्यास का तयार नाहीत. आंबेडकर मैदानावरील कॉंक्रिटीकरण कामात  कोणभागीदार आहेत व इतर विविध ठिकाणी नगराध्यक्षांचे कोण कोण बगलबच्चे सामील आहेत  एक तर तुम्ही ही नावे जाहीर करा, नाहीतर आम्ही तरी जाहीर करतो असे आव्हान – उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केले. 

पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष दत्ता काले, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,  नगरसेवक योगेश बागुल,  जनार्दन कदम, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, वैभव गिरमे,

बबलू वाणी,  अविनाश पाठक   विजय आढाव,  आदिसंह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments