आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावा - स्नेहलता कोल्हे.

 भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावा - स्नेहलता कोल्हे.







कोपरगांव प्रतिनिधी :------ भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.  

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त करुन झालेली घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी  सरकारने प्रयत्न देखील केले पाहिजे असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. स्नेहलता  कोल्हे यांनी व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत हे तपासण्याची गरजचे आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयामध्ये वायरिंग वर्षोनुवर्षे बदली जात नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे मत देखील सौ. कोल्हे यांनी व्यक्त केले.  
या दुर्घटनेत त्या हॉस्पिटल मधल्या परिचारीका आणि काही कर्मचा-यांनी ७ बालकांना वाचवले बद्दल सौ. कोल्हे यांनी आभार मानले. दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण संजीवनी उद्योग समुह व कोपरगांव विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिक सहभागी असल्याच्या भावना देखील सौ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments