Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

राजकिय-सामाजिक स्वास्थ्य बिघडू द्यायचे नसेल तर फ्लेक्स बोर्ड लावायचे टाळा ----विजय वहाडणे.

 राजकिय-सामाजिक स्वास्थ्य बिघडू द्यायचे नसेल तर फ्लेक्स बोर्ड लावायचे टाळा  ----विजय वहाडणे.

  
कोपरगाव प्रतिनिधी :----  शहरात कुणीही वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड लावू नयेत असा निर्णय झाल्याने शहराचे विद्रुपीकरण,रस्ते खोदणे रहदारीला अडथळे कमी झाले आहेत.सर्व नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.तरी काही राजकिय नेते-कार्यकर्ते महापुरुषांचे जयंती,पुण्यतिथी, वाढदिवसाच्या नावाखाली स्वतःच्याच प्रतिमा शहरभर फ्लेक्सद्वारे लावत असतात.

काहीजण वेगवेगळ्या धर्मांचे सण-उत्सव याचे निमित्ताने स्वतःच्या फोटोसह फ्लेक्स लावत असतात.महापुरुष, देवादिकांच्या फोटोपेक्षा नेत्यांचेच फोटो मोठे दिसतात.प्रत्येक प्रसंगाचे निमित्त करून  " शुभेच्छा" देण्याचा धडाका नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी लावला आहे.नेत्यांच्या शुभेच्छा वाचून जनतेचे काहीही अडलेले नाही.

         नगरपरिषदेला नाईलाजाने विनापरवाना बोर्ड जप्त करावे लागतात.एखादा बोर्ड फाडला,विटंबना झाली तर अकारणच वातावरण बिघडून प्रशासनावरील ताण तणाव वाढतो.परवानगी घेऊन फ्लेक्स लावले तरी कुणीही डॉ.आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,म.गांधीजी इ.महापुरुषांचे पुतळे किंवा त्याजवळ फ्लेक्स बोर्ड लावू नयेत.रस्ते खोदून,व्यावसायिकांना अडथळे करून कुणीही फ्लेक्स लावणे योग्य नाही.परवानगी घेतली याचा अर्थ कुठेही-कसेही फ्लेक्स लावून कारवाई करायला भाग पाडू नये.

देव-धर्म-महापुरुष यांच्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेवर प्रेम करणाऱ्यानी भान ठेवून वागावे हिच अपेक्षा.नेत्यांचे तेच तेच चेहरे पाहण्याचे आकर्षण जनतेत नाही हे लक्षात घ्यावे.ज्यांना नेत्यांचे-स्वतःचे फ्लेक्स लावण्याची फार हौस आहे त्यांनी आधी स्वतःच्या मातापित्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स स्वतःच्या घरावर लावावे असा सल्लाही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments