आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव शहरासह जेऊरपाटोदा गावात डुकराचे साम्राज्य वाढले.

  कोपरगाव शहरासह जेऊरपाटोदा गावात डुकराचे साम्राज्य वाढले.

कारवाई करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी.


कोपरगाव प्रतिनिधी :---कोपरगाव शहरासह जेउरपाटोदा गावात व उपनगरात मोठ्या प्रमाणावर डुकराचे साम्राज्य वाढलेले असुन याकडे कोपरगाव नगर पालिकेने व ग्रामपंचायत ने तात्काळ कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली असुन योग्य ती कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते


  कोपरगाव सह लगतच्या जेउरपाटोदा गावात देखील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी न बांधल्याने त्यामुळे मोकाट डुकराचे जसे    साम्राज्य  वाढले तसे शैकडो लहान पिल्ले यांचा देखील उपद्रव वाढलेला आहे या डुकराच्या मालकावर कुठलाही अंकुश नसल्याने यांचा फायदा या समाजातील काही डुकराचे मालक घेत असल्याचे पुढे आले आहे हा प्रकार थांबला नाही तर या मालकावर कठोर कारवाई करण्यासाठी वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले असुन जर हा प्रकार थांबला नाही तर वेळप्रसंगी ग्रामपंचायत व नगरपालिका या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


Post a Comment

0 Comments