दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रभावी योजना राबवाव्या.-- सतिष गुजराथी.
कोपरगावात दिव्यांग मातांचा सत्कार.
![]() |
संंपादक :- शाम दादापाटील गवंंडी
उपसंपादक :-योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :-- सर्वत्र अनेक दिन उत्साहात व डामडौलात साजरे केले जातात. मात्र त्यास अपवाद ठरतो तो म्हणजे दिव्यांग दिन. दिव्यांगांकडे शासनासह सर्वांचे दूर्लक्ष असते. दिव्यांग आजही अनेक शासकीय सवलती पासुन वंचित आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहावे तसेच दिव्यागांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने प्राधान्याने प्रभावी उपक्रम राबवावे.दिव्याग्यांकरता त्यांचे आई वडील विशेष मेहनत घेता त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सतिष गुजराथी यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील दिव्यांग मातांचा सन्मान करण्यात आला यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज,इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियेनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बिपीन गायकवाड, आदिवासी युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तम पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड दिव्यांग माता रत्ना चांदगुडे,आदी उपस्थित होते.यावेळी दिव्यांग माता चांदगुडे म्हणाल्या दिव्यांग दिन हा आमच्या आयुष्यातील तसा वाईट दिवस आहे मात्र या सत्कारामुळे आम्ही सर्व दुःख विसरून क्रुतार्थ झालो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विकास सिनगर, शुभम तांबे, सुभाष पवार, नाना पवार, रघुनाथ माळी, बाळासाहेब मोरे, चांगदेव माळी, संजय पवार, प्रदिप माळी उपस्थित होते.
0 Comments