Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

संजीवनी टाॅडलर्स ‘इनोव्हेशनस फाॅर करीकुलम’ प्रथम पुरस्काराने सन्मानित- सौ. मनाली कोल्हे.

 संजीवनी टाॅडलर्स ‘इनोव्हेशनस फाॅर करीकुलम’ प्रथम पुरस्काराने सन्मानित- सौ. मनाली कोल्हे.

                                                                            
राष्ट्रीय पातळीवर संजीवनीची  नाविण्यपुर्ण भरारी.
कोपरगांव प्रतिनिधी:------ संजीवनी अकॅडमी संचलित संकजीवनी टाॅडलर्सला (कोपरगांव, येवला व शिर्डी ) शैक्षणिक  अभ्यासक्रमातील नाविण्यपुर्ण नवकल्पनांची रचना व त्याची उत्कृष्ट  अंमलबजावणी करीता बिझिनेस वर्ल्ड  एज्युकेशन या राष्ट्रीय  पातळीवर शैक्षणिक  क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने वेगवेगळ्याा  कसोट्यांच्या  व पुराव्यांच्या आधारे ‘टाॅप एज्युकेशन ब्रॅन्डस् २०२०’ अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत ‘इनोव्हेशनस फाॅर करीकुलम फाॅर प्रि स्कूल’ या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविले आहे, अशी  माहीती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
सौ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे सांगीतले आहे की बिझिनेस वर्ल्ड  एज्युकेशन या संस्थेच्या परीपत्रकानुसार संजीवनी टाॅडलर्सने ३ ते ५ वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी  कोविड-१९ च्या विश्वव्यापक  महामारीत ऑनलाईन  पध्दतीने राबविण्यात आलेल्या  क्लस्टर टिचिंग, कौशल्य  विकास, नैतिक मुल्ये, कृतीयुक्त अध्ययन पध्दती, विध्यार्थी व पालकांचे समुपदेशन, इत्यादी उपक्रमांचे पावर पाॅईंट सादरीकरण पाठविले होते. याच बरोबर विध्यार्थ्यांसाठी  राबविण्यात आलेल्या इतरही उपक्रमांची माहिती व त्यांची सत्यता पडताळुन पाहण्यासाठीचे पुरावे पाठविण्यात आले होते. बिझिनेस वल्र्ड एज्युकेशन या संस्थेने या सर्व बाबींची सत्यता व वास्तव स्वीकारून संजीवनी टाॅडलर्सला अंतिम फेरीत प्रवेश  दिला. अंतिम फेरीत ६ परीक्षकांनी व्हर्चअल मिटींगद्वारे विविध प्रश्न  विचारले. आणि या सर्व कसोट्याांमध्ये देशातील इतर १४०  संस्थांमधुन संजीवनी टाॅडलर्स अव्वल ठरले व प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, असे सौ कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे. 
सदरचा पुरस्कार हा विध्यार्थी, पालक, शिक्षक यांना  समर्पित केला असुन या राष्ट्रीय  पातळीवरील यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संचिलिका सौ. मनाली कोल्हे, प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम  व सर्व शिक्षक  आणि विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.    

Post a Comment

1 Comments