आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कर्मवीर काळे कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी कामगारांची मोफत कोविड तपासणी.

कर्मवीर काळे कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी कामगारांची मोफत कोविड तपासणी. 


(काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने ऊस तोडणी कामगारांची कोविड तपासणी करतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी.)

कोपरगाव प्रतिनिधी :- ----- कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या गळीत हंगामात महत्वाचा घटक असलेल्या ऊस तोडणी कामगारांची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मोफत आरोग्य व कोविड तपासणी करण्यात आली असून या तपासणीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे. कोरोनाचे आव्हान घेवून सुरु झालेल्या गळीत हंगामात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून विविध उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशानुसार कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व ऊसतोडणी कामगार यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आरोग्य तपासणी व कोविड तपासणी करणे अनिवार्य होते. साखर आयुक्तालयाच्या सुचनांचे पालन करून कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वीच सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोफत कोविड तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये यशस्वी उपचार करून सर्व बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणी मजुरांच्या व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी व कोविड तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या वसाहतीमध्ये मोफत आरोग्य व कोविड तपासणी शिबीर घेण्यात आले आहे. या शिबिरात ऊस तोडणी मजुरांच्या व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी व कोविड तपासणी करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे. गाळप हंगाम सुरु असतांना साखर आयुक्तालयाकडून दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे आजमितीला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा एकही ऊस तोडणी कामगार कोरोना बाधित नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस तोडणी कामगारांची मोफत आरोग्य व कोविड तपासणी करणारा पहिला कारखाना ठरला आहे. या मोफत आरोग्य व कोविड तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहम, संचालक सूर्यभान कोळपे ,राजेंद्र मेहेरखांब, कार्यकारी संचालक गिरीश जगताप जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद,मुख्य शेतकी अधिकारी कैलास कापसे, डॉ. एस.आर.जैन आदी उपस्थित होते.चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मोरे, डॉ. पी.पी. पतंगे, डॉ. एल. जी. राठोड, डॉ. वाय. बी. माळोदे, डॉ सुरेश जाधव, डॉ. कृष्णा पवार, आरोग्य सहाय्यक आर. एच. शेख, श्रीमती एस.बी. कर्डिले, श्रीमती एस.ए. साबळे, श्रीमती व्ही. एल. तरोळे, पाटील एन.एच., इंगळे एस. आर, श्रीमती भोसले जे.एस. व्ही.एम. गोसावी सुरेगाव, कोळपेवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या आशा सेविका तसेच कर्मवीर शंकरराव काळे कारखाना आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कोपरगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते व तालुका आरोग्य सहाय्यक आर. एम. भांगे यांनी या शिबिरास भेट देवून पाहणी केली. 


Post a Comment

0 Comments