आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ग्रामपंचायत विकासाचा महत्वाचा कणा :आमदार आशुतोष काळे.

 ग्रामपंचायत विकासाचा महत्वाचा कणा :आमदार आशुतोष काळे.






कोपरगाव प्रतिनिधी :---- मागील पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायततीच्या समन्वयातून प्रत्येक गावाचा विकास साधला गेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात.त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत हि विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.


कोपरगाव तालुक्यातील तिळवणी ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर लोकार्पण व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला व त्या माध्यमातून तीळवणी मध्ये १ कोटी ४ लाख रुपयांचे विकासकामे झाली आहेत. तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्यामुळेच ग्रामीण भागातील विकासाचे बहुतांश प्रश्न सुटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  


यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमकारभारी आगवन,सांडूभाई पठाणराहुल जगधनेचांगदेव गायके,ज्ञानेश्वर पगारेअशोक वाघराजाराम पाटील,सोमनाथ शिंदेगजानन शिंदेविश्वनाथ गायके,दत्तात्रय शिंदेपोपटराव शिंदेरामभाऊ खिलारी,वाल्मिक निकमनानासाहेब निकमपोपटराव भुजाडेप्रकाश शिंदेनंदू रांधवणेअशोक उकिरडे,इरफान पटेलपंचायत समिती उपअभियंता उत्तम पवारशाखा अभियंता राजेंद्र दिघे, लाटेविस्तार अधिकारी व प्रशासक वाघमोडेग्रामसेवक योगेश देशमुखठेकेदार विशाल पावलेनिखिल गुजराती,माजी सरपंचउपसरपंचग्रामपंचायत सदस्यव ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments