आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

स्वच्छता गृहांची मोडतोड करणे हे अशोभनीय,शहर आपले आहे याचे भान ठेवा :-- विजय वहाडणे.

 स्वच्छता गृहांची मोडतोड करणे हे अशोभनीय,शहर आपले आहे याचे भान ठेवा :-- विजय वहाडणे.



कोपरगाव प्रतिनिधी :-------  कोपरगाव शहरातील अनेक प्रभागातील काही सार्वजनिक शौचालये,स्वच्छता गृहे(मुताऱ्या)

यांची तोडफोड केल्याचे आढळून येते.काही शौचालयाचे दरवाजे,भांडी,लाईट,नळ यांचे नुकसान काही चुकीच्या प्रवृत्ती करत आहेत,चोऱ्याही होतात.अनेकदा दुरुस्ती करूनही वारंवार असे प्रकार घडत आहेत.दारूच्या बाटल्या, विटकरीचे तुकडे,प्लास्टिक, घुटक्याच्या पुड्या टाकल्याने गटारी तुंबतात,काही डुकराचे मालक जाणीवपूर्वक ड्रेनेज फोडतात. स्वच्छतेसाठी,आरोग्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात.तरीही असे गैरप्रकार घडत आहेत.नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करूनही असे घडणे योग्य नाही.अनेक प्रभागात स्त्री व पुरुषांच्या सोयीसाठी "स्वच्छता गृहे" उभारायची आहेत,पण त्यासाठी जागा मिळत नाहीत.स्वच्छता गृह हवे पण

" आमच्या जवळ-समोर-शेजारी नको" असे अनेकांचे म्हणणे नविन  स्वच्छता गृह बनविता येत नाही,हेही सर्वांनी लक्षात घ्यावे.हे शहर आपले आहे,संपुर्ण शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे.घंटागाड्या असूनही कचरा कुठेही फेकणारे शहराचे आरोग्य धोक्यात आणताहेत.ओला सुका कचरा वेगवेगळा करूनच घंटागाड्यात टाकावा ही विनंती.

Post a Comment

0 Comments