Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

मका खरेदीसाठी मुदतवाढ द्या - आमदार आशुतोष काळे

 मका खरेदीसाठी मुदतवाढ द्या -

आमदार आशुतोष काळे


कोपरगाव प्रतिनिधी:-----  मकाचे दर घसरले असतांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्यास सुरुवात केली होती मात्र मका खरेदी करण्याची मुदत संपल्यामुळे अजूनही बहुतांश शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ही मका शासकीय दराने खरेदी केली जावी यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ व सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यानी असे म्हटले आहे की,यावर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढले आहे. यामध्ये मका पिकाचा देखील समावेश असून मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे.मात्र मकाचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असतांना शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते. मात्र मका खरेदी करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेली मका खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या मकाविक्री करणे अद्याप बाकी आहे त्या शेतकऱ्यांचे  नुकसान होणार आहे त्यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दयावी अशी मागणी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ व सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


Post a Comment

0 Comments