राजकीय फायद्यासाठी बोगस नळकनेक्शन देणारेच पालिकेच्या नावाने बोंबा मारत आहेत---- विजय वहाडणे.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- कोपरगाव नगरपरिषद मेन लाईनवरील नळजोड का तोडत नाही?असे विचारणाऱ्या अतिहुशार व्यक्तींना मी जाहीरपणे सांगतो कि...
वर्षानुवर्षे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता ताब्यात असतांना अनेक माजी नगराध्यक्ष-नगरसेवक व नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता मनमानी करून वेळोवेळी
चुकीच्या पद्धतीने नळजोड दिले व आज पालिकेच्या नावाने बोंंबा मारीत असल्याची टिका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे तसेच त्यात पुढे म्हटले आहे की,
.त्यातील काहींनी पैसे खाऊन,काहींनी वॉर्डमध्ये मतदार खुष ठेवून राजकारण करण्यासाठी, काहींनी नेत्यांच्या आदेशावरून मेन लाईनवर नळजोड देऊन ठेवले.त्यामुळेच त्यातील काहींना 24 तास,काहींना 12 तास,काहींना 8 तास,काहींना 6 ते 4 तास पाणी मिळते.सर्वसामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून बेजाबदारपणे सत्ता भोगणाऱ्यांनी
पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडविला आहे.
सत्ता भोगून झालेलेच काहीजण आज पाणी का पुरत नाही,दिवसाआड पाणी द्या,मेन लाईनवरील नळजोड का तोडत नाही असे विचारत आहेत,निवेदने-बातम्या-फोटो देऊन आपल्यालाच जनतेची फार काळजी असे भासवत आहेत.
कुठलाही विचार न करता मेनलाईनवरील नळजोड तोडायचे ठरल्यास शहरातील अनेक रस्ते फोडावे लागतील.म्हणून रस्त्यांचे नुकसान न करता बेसुमार पाणी वापरणारे नळजोड कमी नियोजन सुरू आहे.
नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नविन सेवक जागे झाले आहेत,होत आहेत.मी नम्रपणे जाहिर करतो कि, बेसुमार पाणी वापर होणारे नळजोड कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तोडले जातील, तसे नियोजन सुरू आहे.बेसुमार पाणी वापरणारे कोण कोण आहेत हे नगरपरिषदेत येऊन तुम्ही पाहू शकता.मेनलाईनवर नळजोड असलेले माजी नगराध्यक्ष श्री. राजेंद्र झावरे यांनी मात्र 2012 मधेच स्वतःहून नगरपरिषदेला पत्र दिले कि, माझे मेनलाईनवरील नळजोड बदलून सबलाईनवर घ्यायला मी तयार आहे.श्री.झावरे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला तसा मनाचा मोठेपणा दाखविणे इतरांना का जमले नाही?
अनेकजण नगराध्यक्षपद भोगून गेले त्यांनी असे नळजोड का तोडले नाहीत,पैसे खाऊन का नळजोड वाटले?याचे जनतेला उत्तर द्या.मी मात्र असे नळजोड कमी करून शहराचे पाणी वाचविण्यासाठी काम करत आहे याची खात्री बाळगावी.
0 Comments