आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

साखळी वृत्तपत्रातील नगर आवृत्तीच्या संपादक चा समावेश असल्याने नगर जिल्हा हादरून गेला.

  साखळी वृत्तपत्रातील नगर आवृत्तीच्या संपादक चा समावेश असल्याने नगर जिल्हा हादरून गेला.





अहमदनगर  प्रतिनिधी :---  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या पत्रकार बाळ ज.बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी सुपारी देऊन केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली .

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर सोमवारी रात्री नगर -पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ त्यांच्या गाडी मध्ये मुले व आई समोरच हत्या करण्यात आली होती . सुरवातीला पोलिसांना हि हत्या रस्त्यावर वाहन चावताना झालेल्या भांडणातून झाली असावी असा संशय होता . मात्र पोलिसांनी सखोल तपास करून पारनेर तालुक्यातून मारेकऱ्यांना अटक केली .

यादरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून सदर हत्या हि सुपारी देऊन करण्यात आली असल्याचे अटक केलेल्या आरोपींनी काबुल केले. हि हत्या करण्यासाठी पत्रकार बाळ ज . बोठे रा. बालिकाश्रम रास्ता अहमदनगर व सागर भिंगारदिवे यांनी सुपारी मारेकऱ्यांना सुपारी दिली असून तेच या खून प्रकरणातील सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले . सध्या बोठे व भिंगदिवे हे दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत असून त्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे जरे हत्याकाडाने जिल्हा सह राज्याला हादरा बसला पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवल्याने  हत्या कांडापासून ते सुपारी देणाऱ्या पर्यंत  उलगडा झाला आहे आता खरे सुपारी देणारे मास्टरमाइंड शोधण्यासाठी पोलीस खात्याने कबंर कसली आहे.


Post a Comment

0 Comments