जात पडताळणी कार्यालय सुट्टीच्या दिवशी ही असणार सुरु.
![]() |

कोपरगाव प्रतिनिधी :--- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० या निवडणूकीच्या अनुशंगाने २५ ,२६ व २७ डिसेंबर २०२० या शासकीय सुट्यांच्या दिवशीही राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिल्याने २५ ,२६ व २७ डिसेंबर या शासकीय सुट्यांच्या दिवशी प्रमाणपत्र पडताळणी साठी अर्ज स्विकारण्यासाठी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जातील अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या कडून देण्यात आली आहे.
राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यात नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरु असल्याने उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे झाले आहे.
0 Comments