आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ब्लड बँक व सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे - आमदार आशुतोष काळे.

 ब्लड बँक व सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे - आमदार आशुतोष काळे.

        कोपरगाव प्रतिनिधी:-----   जीवघेण्या कोरोना संकटाचा फटका संपूर्ण विश्वाला बसला असून या कोरोना संकटामुळे रक्त संकलन देखील थांबले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा निर्माण झालेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी ब्लड बँक व सामाजिक संस्थांनी एकत्र येवून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

                भगवान महावीर युवा प्रतिष्ठाण कोपरगाव व श्री साईनाथ रक्तपेढी शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास आमदार आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी नियमितपणे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी रक्तदानाकडे पाठ फिरविल्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्त शिल्लक नाही. त्यामुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेणे अत्यंत गरजेचे आहे. ब्लड बँक व सामाजिक संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेवून सर्वप्रकारच्या उपाययोजना करून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. रक्तदात्यांनी देखील रक्तदान शिबिरास प्रतिसाद देवून रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकून ९७ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.

                   यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेनगरसेवक मंदार पहाडेगौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदारडॉ. तुषार गलांडे,जैन समाजाचे पंच प्रविण गंगवालविजय पहाडे,आनंद दगडेआनंद पहाडेअमित लोहाडेप्रवीण पाटणीशैलेश ठोळेअमोल कालेपियुष गंगवाल,यश लोहाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments