आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अँड. योगेश खालकर यांच्या तत्परतेमुळे तरूणाची हरवलेली कागदपत्रे व पैसे परत.

अँड. योगेश खालकर यांच्या तत्परतेमुळे तरूणाची हरवलेली कागदपत्रे व पैसे परत.


संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.

क़ोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव
शहरातील गोदावरी मौनगिरी सेतू पुलाजवळ रोख रक्कम व ईतर महत्त्वाचे   त्यात क्रेडीट कार्ड,  डेबिट कार्ड, ओमनचा पासपोर्ट व व्हीजा तसेच  तेथील  कंपनी चे सर्व्हीस कार्ड असा महत्वाचा ऐवज असलेले पाकीट अँड. योगेश खालकर यांना बुधवार २डिसेंबर रोजी रात्री सापडले. यावेळी त्यांनी पाकीट तपासून बघितले व संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित व्यक्तीचा संपर्क होऊ शकला नाही. तदनंतर आज वरील स्वरूपाचे वर्णन करून माहिती सोशल मिडीयावर टाकली असता अवघ्या काही क्षणातच हे पाकीट प्रविण सोपान घिगे  यांंचे असल्याचेे कोपरगाव चे  प्रसिद्ध  बिल्डर प्रसाद नाईक यांच्यामुळे निष्पन्न झाले  त्यावर 

अँड योगेश खालकर यांनी  प्रविण घिगे याची शहानिशा करुन रोख रक्कम व इतर महत्त्वाचा एवज असलेले पाकीट  कोपरगाव येथील अँडव्होकेट चेंबर येथे त्यांच्या आँफीस मध्ये बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.अँड योगेश खालकर यांच्या  तत्पारतेमुळे मला माझे महत्त्वाचे पाकीट मिळाले यामुळे हे महत्त्वाचे कागदपत्रे काढण्यासाठी लागणारा वेळ पैसा वाचला अशी भावना प्रविण घिगे याने यावेळी व्यक्त केली. अँड योगेश खालकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अँड. साहेबराव खालकर, अँड. रमेश दुशिंग  अँड.राहुल वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन साबळे,भाऊसाहेब एरंडे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments