पाणीजार विक्रीकरणाऱ्यांसाठी प्रशासनाने सकारात्मक भुमिका ठेवावी.-- कमलाकर कोते.
![]() |
![]() |
कोते यांनी सांगितले की रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांनी दहा पंधरा लाख रुपये खर्च करून थंडगार पाणी वितरण करण्यासाठी आरो पॅल्ट उभे केले रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केला हि काय चुक आहे का ? अशा लोकांची संख्या जवळपास नगर जिल्ह्यात एक हजाराच्या आसपास आहे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला
सहजपणे परवानगी मिळत नाही हि खरी अडचण या व्यवसायातील अडचण आहे या तीन हि विभागाकडे पुरेसे मनुष्य बळ उपलब्ध नाही या व्यवसायासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या निरेदेशानुसार व भुजल प्राधिकरण व अन्न व औषध प्रशासन यांची परवानगी न घेता महाराष्ट्र भर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे या बाबत दुमत नाही हे जरी खरे असले तरी सकारात्मक भूमिका प्रशासनाने ठेवली पाहिजे अशा प्रकारचा प्रकल्प उभा करण्यासाठी दहा ते पंधरा लाखांची गुंतवणूक करुन किमान महिन्याला लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी अनेकांनी असे प्रकल्प सुरू केले होते त्यातुन काहींना रोजगार देखील मिळाला होता हे नाकारता येणार नाही काही नगर पालिकेने या अगोदर च कारवाई करुण प्रकल्प सिल केले आहे असे अनेक प्रकल्प विविध नावाने थंडगार पाणी जार वितरण करताना दिसुनयेत आहे असे असले तरी अगोदर कोरोणा महामारी आजारामुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी असताना या व्यवसायात ज्यानी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली आहे अशा लोकांना मात्र या कारवाईमुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे बेरोजगारीचे संकटं उभे राहणार आहे अनेक कुटुंबांना यांचा फटका बसणार आहे हा एक प्रकारे अन्याय असुन ज्या विभागाचा यासाठी संबंध येतो त्या विभागाचा सामान्य माणसासाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण असे होताना दिसुन येत नाही हे दृदैव आहे त्यासाठी आपण नगर जिल्ह्यातील चालकाच्या माध्यमातून लढा देण्यासाठी वचनबध्द असुन न्याय मिळाला नाहीतर थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगताना या लोकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी लवकरच या सर्व लोकांची बैठक घेणार असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले.
0 Comments