संजीवनी फार्मसीच्या १२ विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गम नोकऱ्यांसाठी निवड -श्री. अमित कोल्हे
कोविड १९ च्या काळात व्हर्चुअल पध्दतीने कंपन्यांनीने केली निवड.
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी :---- कोविड १९ च्या काळात अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची कपात केल्यामुळे अगोदर नोकरीत असलेल्या अनेक युवक-युवतींची स्वप्ने भंग पावली. मात्र अशा परीस्थितीमध्येही संजीवनी फार्मसी महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने या काळात अंतिम वर्ष बी. फार्म व एम. फार्मच्या विध्यार्थांना आवश्यक ते प्रशिक्षण देवुन नामांकित कंपन्यांशी सपर्क साधत रू ३. ८५ लाख पर्यंत वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यानी संजीवनीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला, अलिकडेच नामांकित कंपन्यांनी संजीवनी फार्मसीच्या १२ विध्यार्थांची नोकरीसाठी निवड झाली असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की अडवान्सड मायक्रोडिवायसेस प्रा. लि. या कंपनीने नितीन विजय शेळके याची टेक्नालाॅजी एक्झिक्युटिव या पदावर सुरूवातीस वार्शिक पॅकेज रू ३. ८५ लाख देवु करून निवड केली तर विठ्ठल साहेबराव गुंजाळ याची मॅकलिओडस् फार्मास्युटीकल लिमिटेड या कंपनीने निवड करून रू ३. ८० लाखांचे वार्षिक पॅकेज दिले. अजय सुनिल साबळे याची विसेन इन्फोटेक प्रा लि. या कंपनीने वार्षिक पॅकेज रू ३. ५५ देवुन सेफ्टी सायन्स अनालिस्ट पदावर नियुक्ती केली. उन्नती मनिश पटेल हिची फार्मालिफ प्रा. लि. या कंपनीने रू ३. २५ लाख वार्षिक पॅकेज देवुन निवड केली. तसेच कोव्हॅन्स इंडिया फार्मास्युटीकल सर्विसेस या कंपनीने अंकिता अरूण गोऱ्हे व वृषाली राजेश खडांगळे यांची रू ३. २० लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली. सॅन्डोझ प्रायव्हेट लि. कंपनीने सुमित प्रकाश मराठे व करण संजय चांदगुडे यांची निवड केली. काॅग्निझंट टेक्नाॅलाॅजी सोल्युशन इंडिया कंपनीत पंकज कैलास देशमुख, रूबिकाॅन रिसर्च कंपनीत भूषण भगिरथ नालकर याची तर वेस्ट कोस्ट फार्मास्युटीकल वर्कस् या कंपनीने संतोष मधुकरराव देशमुख व कोमल राजेंद्र मलिक यांची निवड केली.
अंतिम वर्षातील ज्या विध्यार्थ्यांना नोकरी हवी आहे अशा ८० ते ९० टक्के विध्यार्थांना संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत त्यांची कंपनी निहाय ज्ञानाची गरज ओळखुन प्रशिषिक्षीत केल्या जाते. याच बरोबर बदलत्या तंत्रज्ञानानुसार व्हर्चुअल पध्दतीने मुलाखत कशी द्यावी, याचेही प्रषिक्षण देण्यात येते. या सर्व बाबींमुळे संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने ग्रामीण महाराष्ट्रात नोकऱ्या मिळवुन देण्याच्या बाबतीत मुसंडी मारली आहे, असे श्री. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री. शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी निवड झालेले सर्व विध्यार्थी व त्यांचे पालक आणि प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments