शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी चा पाठिंबा.
------- संदिप वर्पे.
![]() |
![]() |
हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी लाखो शेतकरी अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत.
संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे.यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हा व तालुका पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संदिप वर्पे यांनी केले आहे.
0 Comments