खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा.
आमदार आशुतोष काळेंच्या तहसीलदार, प्रांताधिकारी तहसीलदारांना सूचना
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांनी त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या होत्या. त्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनदरबारी पाठपुरावा सुरु असून हे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील मात्र खंडकरी शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी तालुकास्तरावर येत आहेत त्या अडचणी तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी तातडीने सोडवाव्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.
खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण स्वतंत्रपणे बैठक घेवू असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी मागील महिन्यात राहाता येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात खंडकरी शेतकऱ्यांना दिले होते. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी नुकतीच खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राहाता तहसील कार्यालय येथे बैठक घेऊन खंडकरी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी ते बोलत होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे येत असलेल्या अडचणी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने काही खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या त्या कमी मिळाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना ज्याठिकाणी जमिनी देण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी पूर्वीचे अतिक्रमण आहे. आदी समस्या या बैठकीत मांडल्या. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी या पैकी बहुतांश समस्या ह्या तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या अखत्यारीत असून प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी या समस्या सोडवाव्या. ज्या समस्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनाच्या महसूल विभागाकडे प्रलंबित आहे त्याबाबत आपण जातीने लक्ष घालून या समस्यांचा निपटारा करू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,जिनिंग, प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक सुरेश अभंग, भूमी अभिलेख अधीक्षक भास्कर कचरे, राहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, मुरलीधर थोरात, गंगाधर चौधरी, दिलीप चौधरी, प्रसाद काळवाघे, नामदेव धनवटे, राजेंद्र चौधरी, डॉ. प्रताप गायकवाड, प्रा. बाबासाहेब गवारे, शिवाजीराव साबदे,गणेश येलम, विनोद धनवटे आदींसह खंडकरी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments