डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून समाजाला प्रगतीसाठी दिशा मिळत आहे - आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :--भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड बुद्धिमत्तेचा महासागर होते. समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी समाजासाठी आपले आयुष्य वेचलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बहुमोल संदेश आपल्या जीवनाला नेहमीच दिशा देण्याचे काम करीत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण व त्यांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण गरजेचे असून आजही त्यांच्या विचारातून समाजाला आजही प्रगतीसाठी दिशा मिळत आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, संतोष चवंडके, डॉ. अजय गर्जे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक दिनार कुदळे, कृष्णा आढाव,दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, सौ. मायादेवी खरे,राहुल देवळलीकर, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, सुनील मोकळ, दादासाहेब साबळे, रावसाहेब साठे, चंद्रशेखर म्हस्के, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, बापू वढणे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे,मनोज कडू, संतोष टोरपे, धनंजय कहार, शुभम लासुरे, जय बोरा, सलीम पठाण, आकाश डागा, गणेश लकारे, प्रकाश दुशिंग, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय त्रिभुवन, नितीन शिंदे, मनोज शिंदे, शंकर घोडेराव, प्रताप गोसावी, मुन्ना पठाण,संतोष बारसे आदी उपस्थित होते.
0 Comments