बेपत्ता दिप्ती सोनी पतीच्या ताब्यात देण्याचा न्यायालयाचा आदेश.
शिर्डी शहरातून बेपत्ता असलेल्यांचे एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश.
![]() |
![]() |
शिर्डी पोलिस स्टेशन चे एक पथक इन्दौर येथे गेले होते शोध घेवुन हि ती सापडली नाही मात्र परतीच्या प्रवासाला निघाले असता ती सापडली आहे असा निरोप पथकाला मिळाल्याने हे पथक माघारी जाऊन या महिलेला घरच्या ताब्यात दिल्यानंतर दोन लहान मुलांनी आपल्या आईला साडेतीन वर्षांच्या नंतर बघितल्यावर आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली त्यावेळी पोलिसांना हि ती सापडल्याने मोठे समाधान व्यक्त केले असे असले तरी बेपत्ता झाल्यानंतर आपण कोठे होतो काय झाले याबाबत बारीक सारीक चौकशी करण्यासाठी प्रयत्न केला मात्र याबाबत दिप्ती सोनी फार काही बोलत नसल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते असे असले तरी बहुचर्चित प्रकरणात हि महिला कोठे होती तीला कोणी आश्रय दिला ती कोणाच्या सहवासात होती ती परत तिच्या गावातच कशी मिळुन आली तिच्या बहिणीलाच ती कशी मिळुन आली याबद्दल शिर्डी सह नगर जिल्ह्यातील लोकांना उत्सुकता असुन त्याचा देखील शोध शिर्डी पोलिसांनी घेतला पाहिजे तशी मनोज सोनी यांनी देखील मागणी केली असली तरी तीने मात्र या विषयावर मौन बाळगले आहे असे समजते.
0 Comments