Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

राज्यात मुली आणि महिलांवर वाढते अत्याचार, विकृतीने गाठला कळस ; पेण येथील घटनेचा केला जाहीर निषेध - सौ स्नेहलता कोल्हे

 राज्यात मुली आणि महिलांवर वाढते अत्याचार, विकृतीने गाठला कळस ; पेण येथील घटनेचा केला जाहीर निषेध - सौ स्नेहलता  कोल्हे   

 


कोपरगाव प्रतिनिधी:-------  राज्यभरात मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून या विकृतीने कळस गाठला आहे. वारंवार घडणा-या या घटनांमुळे गुन्हेगारांवर धाक राहिला नाही, याची राज्यसरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून या प्रकारांना आळा बसण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील पिडीतांना तातडीने न्याय देण्याची आवष्यकता असल्याची प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश  सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली.
नुकतीच पेण येथील आदिवासी समाजातील अडीच वर्षाच्या बालिकेची बलात्कार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा जाहीर निषेध करून मन सुन्न करणारी घटना अतिशय निंदनीय असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या. वारंवार सदरच्या घटना घडत असून हा गुन्हा करणारी व्यक्ती एकच नव्हे तर दुस-यांदा असा गुन्हा करतो म्हणजे राज्यात कायदयाचा धाक आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात असे प्रसंग करण्याचे धाडस होणार नाही,यासाठी सरकारने कठोर पाउले उचलण्याची गरज असून महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने कठोर पाउले उचलावीत, तरच  ख-या अर्थाने शाहु, फुले आणि डाॅ आंबेडकरांच्या विचाराचा वारसा चालवीत आहोत, असे म्हणता येईल. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही. गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबीर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणा-या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे अशा घटनामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होतांना दिसत आहे, या सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकी बाळींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल. असे मत सौ कोल्हे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments