आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाच नं. साठवण तलाव अंदाजपत्रक संबंधी जिल्हाधिकारी गुरुवारी घेणार बैठक -आमदार आशुतोष काळे.

 पाच नं. साठवण तलाव अंदाजपत्रक संबंधी जिल्हाधिकारी गुरुवारी घेणार बैठक

                               -आमदार आशुतोष काळे.

                

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पाणी प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी पाच नं. साठवण तलावाची समक्ष जावून पाहणी करून पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषद अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले गुरुवार (दि.१७) रोजी घेणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

             पाच नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. यापुढील कामास जलदगतीने प्रारंभ होवून तलावाचे काम पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीने पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार होणे क्रमप्राप्त असून मागील आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाच नं. साठवण तलावाची पाहणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्यापुढे कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबरोबरच शहर व ग्रामीण भागाच्या रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे त्यांचे लक्ष वेधून कोविड केअर सेंटरसाठी निधी मिळावा अशी मागणी केली.

              कोपरगाव शहरातील नागरिक मागील काही वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करीत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना कधी-कधी २१ दिवसांनी पाणी मिळते. कोपरगाव शहरासाठी पाणी आरक्षित असून देखील केवळ साठवण क्षमता नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्यासाठी पाच नं. साठवण तलावाचे काम लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पाणी प्रश्नाची दखल घेवून साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार (दि.१७) रोजी संयुक्त बैठक घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे. 

                       जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान कोपरगाव शहर व तालुक्याच्या रस्त्यांबाबत तसेच विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून विकासकामांचे प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवा ते प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पुढील मंजुरीसाठी वरिष्ठांकडे त्वरित पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

       यावेळी प्रांताधिकारी गोविद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, सुनील बोरा आदी उपस्थित होते.

           

Post a Comment

0 Comments