Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कृभकोने महाराष्ट्रातील शेतक-यांकरीता चार लाख मे.टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा----- बिपीन कोल्हे .

 कृभकोने महाराष्ट्रातील शेतक-यांकरीता चार लाख मे.टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा----- बिपीन कोल्हे .


 कोपरगाव प्रतिनिधी :------- कृभको भारती को आँँप. संस्था अर्थात कृभको ने महाराष्ट्रातील युरिया ची गरज लक्षात घेउन मागील वर्षीच्या  तुलनेत चार लाख मे.टनापेक्षा जास्त युरीयाचा पुरवठा करावा. अशी मागणी कृभकोचे जनरल बाॅडी प्रतिनिधी, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी केली आहे. 

नवी दिल्ली येथे कृभकोचे चेअरमन चंद्रपाल सिंह यादव यांचे अध्यक्षतेखाली सदरची आॅनलाईन सभा घेण्यात आली. यावेळी कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक राजन चैधरी यांनी प्रास्ताविक केले.  देशभरातून कृभकोचे सुमारे 60 ठिकाणाहून या बैठकीसाठी सदस्य जोडले गेले होते. नागपूर, पुणे आणि कोपरगाव या ठिकाणी महाराप्ट्रातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या कृपक भारती को आॅप संस्था नवी दिल्लीच्या कृभकोच्या 40 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेप्रसंगी श्री कोल्हे यांनी मागणी केली. कोपरगाव येथे झालेल्या या  सभेसाठी जनरल बाॅडी प्रतिनिधी रामनाथ चिंधू पाटील जळगाव, भगवानराव काजे, कन्नड, पराग संधान कोपरगाव, डी. पी.मोरे कोपरगाव, जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, टि.आर. कानवडे तसेच कृभकोचे अधिकारी धनाजी देषमुख,नाशिक, सुदर्शन पाटील, अहमदनगर व शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक श्री हरीभाउ गोरे हे उपस्थित होते. 

यावेळी श्री कोल्हे पुढे म्हणाले की, मागील वर्षात कृभकोने 4 लाख मे.टन युरियाचा पुरवठा महाराष्ट्र्राकरीता केला होता, परंतु यावर्षी 1 लाख 85 हजार मे.टन इतका पुरवठा केलेला असल्याने त्यामध्ये वाढ करुन मागील वर्षाप्रमाणे महाराष्ट्र्रासाठी युरीयाचा तुटवडा लक्षात घेउन कृभकोने याहीवर्षी  4 लाख मे.टन युरीयाचा पुरवठा करावा त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या कंपोस्ट खताचा 5 हजार मे.टन पुरवठा केला होता त्या पुरवठयात वाढ करून यावर्षी कंपोस्ट खते 10 हजार मे.टन पुरविण्यात यावी अशी मागणीही श्री कोल्हे यांनी केली.यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रपाल सिंह यादव यांनी कृभको सभासद संस्थांकरीता 15 टक्के लाभांशाची घोषणा करून महाराष्ट्रकरीता झालेल्या युरियाच्या मागणीसंदर्भात अनुकुलता दर्शविली तसेच मागील वर्षाच्या मिश्र खताच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने समाधान व्यक्त करून महाराष्ट्रातील प्रतिनिधींचे अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments