जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लघन केले म्हणून शिर्डी शहरात गुन्हा दाखल.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:------- शिर्डी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७६९/२०२० भादवी कलम १८८.२६९ चे कलम ५१ प्रमाणे दिनांक १०/१२/२०२० रोजी दीपक गंधाले यांच्या फिर्यादी वरून साईबाबा मंदिर परिसरात तृप्ती देसाई यांचे आंदोलन होते त्या ला विरोध करण्यासाठी तीस ते चाळीस जण एकत्र आले होते .
आनंद दवे धनंजय पाटील वंदना राजेंद्र गोंदकर मनीषा सचिन शिंदे रेखा वैद्य स्वाती परदेशी अलका कोते सुनील परदेशी नानासाहेब बावके आनंद दवे शिवाजी चौधरी शोभा वर्पे रुपाली तांबे व इतर तीस ते चाळीस लोक साईबाबा संस्थान च्या गेट नबंर चार जवळ बेकायदेशीर जमून भुमाता बिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यास अटक झाल्याने गेट नंबर चार जवळ एकत्र येऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेश झुगारून घोषणा देत फटाके फोडले व म्हणून यांच्या विरोधात आदेश क्रमांक डी सी / कार्या/९ ब १/२१४१/ २०२० अहमदनगर याचे आदेशाचे उल्लंघन करतांना आढळून आले म्हणून साथ प्रती.कायदा १८९७ चे कलम २ प्रमाणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे.
0 Comments