आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात - आमदार आशुतोष काळे

 शहराचा पाणी प्रश्न  कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात - आमदार आशुतोष काळे







कोपरगाव प्रतिनिधी :------  कोपरगाव शहराला सध्या ६ दिवसाड पाणी पुरवठा होतो. पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटी रूपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण (अंदाजे खर्च १८ लाख ५३ हजार) व प्रभाग क्रमांक सहा मधील नाथाभाऊ घर ते राममंदिरापर्यंत डांबरीकरण करणे (अंदाजे खर्च (२१ लाख १९ हजार) या कामांचा मंगळवार (दि.२९) शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होतेयावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणेराष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विरेन बोरावकेनगरसेवक मंदार पहाडे,मेहमुद सय्यदसंदीप पगारेनगरसेविका प्रतिभा शिलेदारवर्षा शिंगाडेउद्योजक कैलास ठोळेचंद्रकांत अजमेरेराष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गंगुलेशिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियालभरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारुन कामाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे  बोलतांना आमदार आशुतोष काळे  म्हणाले कीशहराचा पाणी प्रश्न गंभिर झाल्याने  पालीकेच्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी विषेश प्रयत्न केला आहे. नविन पाच नंबर तलावाचे ३० टक्के काम झाले आहे उर्वरित ७० टक्के तलावाचे काम व शहरातील वाढीव पाईपलाईनच्या कामा करीता १०५ कोटी रूपये निधीची गरज आहे ती निधी मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारीमहाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. नविन वर्षात १०५ कोटीच्या निधीला अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे सांगून शहरवासीयांना नव्या वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा आमदार काळे यांनी दिल्या. नगरपालीकेच्या निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या  उमेदवाराचा पराभव झाला तरीही  वहाडणे यांना शहर  विकासकामत सतत सहकार्य केले म्हणूनच इतके विकासकामे गतीमान होत आहेत. कोपरगाव शहराच्या विकासाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी पाठविले असून त्याबाबत पाठपुरावा सुरू असून त्या प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासुन शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील एस. जीप्राथमिक शाळेसमोरील रस्त्याचे काम झाले नाही त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्याचे समाधान आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले कीआमदार आशुतोष काळे आमदार झाल्या पासुन नव्हे तर मी जसा नगराध्यक्ष झालो तेव्हापासून  शहराच्या विकास कामात पुर्ण सहकार्य करीत आहेत. म्हणुनच गेल्या १० वर्षात जितके कामे झाले नसतील त्यापेक्षा अधिक कामे ४ वर्षात झाली. यापुढेही कोट्यावधी रुपयांची कामे होणार आहेत. निवडणूकीत जरुर राजकारण करावे मात्र शहर विकासात राजकारण करु नका असा सल्ला विरोधकांना दिला.

यावेळी  यावेळी सुनिल गंगुलेमंदार पहाडेप्रतिभा शिलेदारमेहमुद सय्यदकलविंदर दडियाल यांनी मनोगत व्यक्त केले.

      या कार्यक्रमाला नगराध्यक्ष विजयराव वहाडणेकैलासशेठ ठोळेचंद्रकांतशेठ ठोळेदिलीपशेठ अजमेरेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेशिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियालनगरसेवक गटनेते वीरेन बोरावकेमंदार पहाडेसौ. प्रतिभाताई शिलेदारहाजी मेहमूद सय्यदसौ. वर्षाताई शिंगाडेअजीज शेखराजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदारविद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील पवार, डॉ. अमोल अजमेरेरमेश गवळीकृष्णा आढाव, फकिरमामु कुरेशीभरत मोरेसुनील बोराबाळासाहेब रुईकरराहुल देवळालीकर, जावेद शेखप्रकाश दुशिंगविजय नागरेसंतोष टोरपेराजेंद्र जोशीसमीर वर्पेलक्ष्मण सताळेप्रफुल्ल शिंगाडेविजय बंबमनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाडसुनील फंडवाल्मिक लहिरेनिखिल डांगेइम्तियाज अत्ताररावसाहेब साठेविजय त्रिभुवनरामदास खैरेजनार्दन केकाणअरविंद पटेलचंद्रकांत कासलीवालभाऊसाहेब लोहकरे, अखिल चोपदारतिलकशेठ अरोरागुलशनशेठ होडेरवींद्र देवरेमच्छिन्द्र टेकेगणेश लकारेप्रफुल्ल शिंगाडेबाला गंगूलेविजय त्रिभुवनअंबालाल पोरवालश्रीकांत राठीराजेंद्र लोढेमुन्ना मन्सूरीसलिम चोपदारप्रवीण शेलारभूषण पाटणकरविजय दाभाडेदीपक देशमुखशुभम दुशिंगनितीन शिंदेरशीदभाई शेखबिलाल पठाण आदी उपस्थित होते. यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्तेनागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले.


 कोपरगाव शहराचा पाणी प्रश्नविमानतळासाठी ३०० कोटी व कोपरगाव शहराचे महत्वाचे प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी अल्पकाळातच मार्गी लावले याबद्दल त्यांच्या कार्यशैलीचे कौतूक करून कोपरगाव शहरातील विकास कामाचा जो सपाटा  सुरू आहे तो अविरत सुरू ठेवावा अशी आशा व्यक्त करीत पाटपाण्याचे योग्य नियोजन केल्या बद्दल आमदार काळे यांचे उद्योजक  कैलास ठोळे अभिनंदन केले.


 कोपरगाव शहराच्या विकासात खीळ घालणाऱ्यांना कोपरगावच्या जनतेने सत्तेपासून खड्यासारखे दूर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना निवडून दिले - नगराध्यक्ष विजयराव वहाडणे.


Post a Comment

0 Comments