आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

गुन्हयांचा तपास लागत नसल्याने जनता नाराज. कोपरगाव पोलिसांनी जनतेला सन्मानाची वागणूक द्यावी.

  गुन्हयांचा तपास लागत नसल्याने जनता नाराज.

कोपरगाव पोलिसांनी जनतेला सन्मानाची वागणूक द्यावी.


संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.


कोपरगाव प्रतिनिधी :--  कोपरगाव शहरातील श्रद्धा नगरी परिसरात राहत असलेले व्यापारी अक्षय कैलास लोहाडे यांचा भर दुपारी बंगला फोडून १६नोव्हेंबर २०२०रोजी एक ते दोन सुमारास  बंगल्याचा दरवाजा तोडून जवळपास पावणेतीन लाख रुपये रोख  व जवळपास दोन लाखांचे सोने असा जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. लोहाडे यांच्या फिर्यादीवरून भा.द.वी.४५४,३८०घर फोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली होती. घटनास्थळी स.पो.नि.दिपक बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.  या गुन्हांचा तपास देखील त्यांच्याकडेच आहे . जवळपास वीस दिवस उलटूनही हा गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना अपयश आले आहे. अधिक माहिती अशी की, कोपरगावात पोलिसिंगचा धाक नसल्याने त्याचा फायदा गुन्हेगारांनी घेण्यास सुरवात केली आहे.

  जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस व जनता या बरोबरच प्रसिद्धीमाध्यमाशी सुसंवाद साधत असताना कोपरगाव पोलीस मात्र गुन्हेगारी संदर्भात घटना व माहिती देण्याचे टाळत असल्याचे दिसून येते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी काही अडचण असेल तर मला थेट एस एम एस करा कारवाई करतो असे सांगत असतांना हे तपासी अधिकारी मात्र फार काही समाधानकारक माहिती जेंव्हा पत्रकारांना सुध्दा देत नाही तेव्हा फिर्यादी चे समाधान कसे काय करत  असतील याचा प्रत्यय येताना दिसून येत आहे.   अधिकारी संजय सातव थेट जनतेशी संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना कोपरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जर  जिल्हा पोलिस प्रमुखांच्या जनता पोलीस सुसंवाद या अभियानाला खोडा घालत असतील तर हे अभियान कसे यशस्वी होईल? असा प्रश्न कोपरगावातील नागरिकांना पडला आहे. कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गेल्या काही कालावधी पासून विविध गंभीर गुन्ह्यांची पेंडंसी देखील मोठ्या प्रमाणात आहे. चोरी, घरफोडी, धूम स्टाईल चोरी,  वाहन चोरी, टोळी युध्दातील फरार अरोपी या बरोबरच अशा विविध गुन्हांचा तपास देखील लागलेला नाही. जर जनतेलाच सन्मानाची वागणूक मिळणार नसेल तर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व माहिती देण्यासाठी कोणी पुढे येईल का? हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असून कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये मिळत नसलेल्या समाधान कारक वागणुकीमुळे खरोखरच खबरी माहिती देण्यासाठी पुढे येईल का? ही देखील संशोधनाची बाब ठरणार आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव व आमदार अशुतोष काळे यांनी लक्ष घालावे असा सूर जनतेमधून येत आहे.

Post a Comment

0 Comments