आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्यासाठी १९.३९ कोटीची तरतूद कामाची निविदा प्रसिद्ध

 सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्यासाठी १९.३९ कोटीची तरतूद कामाची निविदा प्रसिद्ध

                    सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याला लागलेलं ग्रहण सुटणार – आमदार आशुतोष काळे

                      



कोपरगाव प्रतिनिधी :---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय मार्गाची सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंत अत्यंत दुरावस्था झाली होती. या महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने काम सुरु करावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असूनसावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी. रस्त्यासाठी १९  कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ जानेवारी निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख असून फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निविदा उघडून या कामाचे टेंडर दिले जाणार आहे. त्यामुळे मागील पाच वर्षापासून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याला लागलेलं ग्रहण लवकरच सुटणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                            आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर-मनमाड राष्ट्रीयमार्ग हा मागील काही वर्षापासून अक्षरशः मृत्यूचा सापळा झाला होता. या रस्त्यावर सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी मार्गावर  लहान-मोठी अनेक खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन सावळीविहीर फाटा ते कोपरगाव परिसरात अपघातांची संख्या वाढली होती. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु असतांना अहमदनगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटाकोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नरशिर्डी,अहमदनगरदौंडबारामतीपैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आल्यामुळे  सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे याबाबत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची देखील दिल्ली येथे भेट घेवून निधीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे रस्ता खराब झाल्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय व होत असलेल्या अपघाताबाबत कैफियत मांडून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून या मार्गावरील खड्डे देखील बुजविण्यात आले होते.  व नुकतेच राज्यमार्ग रस्ते वाहतूक  मंत्रालयाने या रस्त्याच्या पूर्ण दुरुस्तीच्या कामाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चांदवड-मनमाड-कोपरगाव-शिर्डी या राष्ट्रीय महामार्ग ७५२ – जी या मार्गावरील कोपरगाव ते सावळीविहीर फाटा या १०.५०० कि.मी. रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी अंदाजे १९  कोटी ३९ लाख ४९ हजार १२४ रुपये खर्च अपेक्षित असून रस्ते दुरुस्ती कंपनीला आपली निविदा २७ जानेवारी पर्यंत सबंधित विभागाकडे दाखल करावी लागणार असून निविदा उघडल्यानंतर शासन नियमामुसार पात्र कंपनीला दुरुस्तीचे काम देण्यात येणार आहे.

                       या रस्त्याचे काम घेणाऱ्या कंपनीला तीन वर्षाच्या आत काम पूर्ण करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे साक्षात मृत्यू घोघावत असलेल्या या रस्त्याची साडेसाती कायमची मिटणार आहे. हे वर्ष पूर्ण जीवघेण्या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात गेले असून त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मागील दोन ते तीन महिण्यापासून अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असून महाविकास आघाडी सरकारने एवढ्या बिकट परिस्थितीत देखील या रस्त्यासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल केंद्रीय रस्तेविकास मंत्री नामदार नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानत असून उर्वरित विकासकामांना निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

                     कोरोना संकटात विकासकामांना निधी मिळणे अशक्यप्राय असतांना मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३००  कोटी, विमानतळ व पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाचा देखील पाठपुरावा सुरु असून लवकरच यश मिळेल अशी अपेक्षा आहे. विकासकामांचा पाठपुरावा केल्यास यश मिळते यावर माझा विश्वास असून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी. रस्त्याच्या कामासाठी प्रसिद्ध झालेली निविदा हे त्याचेच फलित असून मतदार संघातील नागरिकांना हि नवीन वर्षाची भेट आहे.-आमदार आशुतोष काळे.

                     सावळीविहीर फाटा ते भरवस फाटा या ४५ कि.मी.मार्गाचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळून भरवसफाटा ते कोपरगाव तालुक्याची हद्द असलेल्या सात मोऱ्या पर्यंत  काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र कोपरगाव तालुक्याची हद्द असलेल्या सात मोऱ्या ते सावळीविहीर फाटा या मार्गावर चासनळी, देर्डे फाटा, झगडे फाटा आदि ठिकाणी छोटे-मोठे पूल बांधणे गरजेचे असल्यामुळे ते पूल पूर्ण करण्याला आमदार अशोकराव काळे यांनी प्रथम प्राधान्य देवून २०१४ पर्यंत हे पुलांचे काम पूर्ण केले मात्र त्यानंतर आजतागायत या राज्यमार्ग ७ वरील उर्वरित देर्डे फाटा ते सात मोऱ्यापर्यंतच्या ३३ किमी रस्ता दुरुस्तीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होवून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी या ३३ किमी रस्त्याचा आशियाई विकास बँकेच्या (ADB)अर्थसहाय्य योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करण्याच्या केलेल्या मागणीला सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिलेला हिरवा कंदील व सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या १०.५०० कि.मी. रस्त्यासाठी १९  कोटी ३९ लाख ४९ हजार रुपये निधीची झालेली तरतूद यातून आमदार आशुतोष काळेंनी रस्ता दुरुस्तीचे आवाहन स्वीकारल्याचे सिद्ध होत आहे.

Post a Comment

0 Comments