आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माती परीक्षण काळाची गरज:आमदार आशुतोष काळे.

 माती परीक्षण काळाची गरज:आमदार आशुतोष काळे.

                      जागतिक मृदा दिनानिमित्त मृदा परीक्षण व खत व्यवस्थापन कार्यक्रम. 


कोपरगाव प्रतिनिधी :--आपल्या  कृषिप्रधान देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास साठ टक्के नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. मात्र मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या बाबतीत वेळच्यावेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला असून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे उत्पादन खर्च वाढण्याबरोबर जमिनीचे स्वास्थ देखील बिघडले आहे. त्यामुळे वेळेवर मातीचे परिक्षण होणे गरजेचे आहे. माती परीक्षण झाल्यास जमिनीत कोण कोणते घटक आहेत याची अद्यावत माहिती मिळून त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा देवून भांडवली खर्च कमी होऊन भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते व मातीचे स्वास्थ्य देखील अबाधित राहते त्यासाठी माती परीक्षण हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. 
जागतिक मृदा दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित कांदा पिकाचे मृदा परीक्षण व खत व्यवस्थापन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याप्रमाणे जमिनीच्या आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. माती परीक्षण करून रासायनिक खतांचा वापर कमी होवून जमिनीतील अन्नद्रव्याच्या कमी अधिक प्रमाणानुसार खतांचा संतुलित वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. शेती व शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वर्षभरात एकच दिवस मार्गदर्शन शिबीर न घेता नियमितपणे शिबीर घेणे व जनजागृती करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी फायद्याचा शेती व्यवसाय करण्यासाठी अशा मार्गदर्शनपर शिबिरात उत्स्फुर्तपणे  सहभागी झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या बाबतीत मागील पाच वर्षात योग्यवेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. त्याचा विपरीत परिणाम होऊन आज शेतकऱ्यांची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे. शेतीचा उत्पन्न खर्च कमी करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून शेती व्यवसायाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून अशा शिबिराच्या माध्यमातून हा उद्देश नक्कीच सफल होईल असे मत आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केले. 
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नानासाहेब सिनगर, भोजडेच्या सरपंच रतनबाई सिनगर, उपसरपंच वाल्मिक सिनगर, तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर, प्रगतीशिल शेतकरी राजेंद्र खिलारी, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत दवंगे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित होते. यावेळी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी कांदा पिकाचे मृदा परीक्षण आधारित खत व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून विजेच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या त्यावरून मतदार संघात विजेचा प्रश्न किती गंभीर आहे याचा अनुभव आला तेव्हापासून सातत्याने हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रोहीत्रावरील भार कमी करणे, नवीन रोहित्र बसविणे, वीजवाहिन्या स्थलांतरित करणे, आदी उर्जा खात्याच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. मतदार संघातील सर्व गोष्टीवर माझे बारीक लक्ष आहे.
- आमदार आशुतोष काळे 

Post a Comment

0 Comments