Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

एस.एस.जी.एम. कॉलेजचा विद्यार्थी आयुष आहेर ‘जाम’ परीक्षा उत्तीर्ण.--प्राचार्य डॉ.शंकररावथोपटे

 एस.एस.जी.एम. कॉलेजचा विद्यार्थी आयुष आहेर ‘जाम’ परीक्षा उत्तीर्ण.--प्राचार्य डॉ.शंकररावथोपटे

                            


कोपरगांव प्रतिनिधी :--    येथील  एस.एस.जी.एम.कॉलेजचा  रसायनशास्त्र विभागातील बी.एस्सी. उत्तीर्ण झालेला गुणी विद्यार्थी आयुष आहेर याने नुकत्याच झालेल्या आय आय टी ‘जाम’ परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केले असून  त्याची रसायनशास्त्र विषयातील उच्च शिक्षण घेण्यासाठी जालंधर  येथे निवड झाली आहे. ही बाब रसायनशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे, सायन्स विभागाचे उपप्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.ए.के.देशमुख, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. आर.एस.झरेकर, उपप्राचार्य डॉ विजय निकम  व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. व्हि.बी.गायकवाड यांनी  त्याचे अभिनंदन केले. सदर परीक्षा आय आय टी मधील नामांकित असून त्यामध्ये नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना चांगली स्कॉलरशिप मिळते व संशोधनामध्ये भरीव योगदान देता येते. त्याला प्राचार्य डॉ.थोपटे विभाग प्रमुख प्रा.देशमुख व रसायन शास्त्रातील सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments