आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी शहरातुन रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली महिला ४०महिन्यानतर इंदौर येथे सापडली.

    शिर्डी शहरातुन रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली महिला ४०महिन्यानतर इंदौर येथे सापडली.




शिर्डी प्रतिनिधी :-------   बहुचर्चित इंदौर येथील शिर्डी शहरातुन १० /८/२०१७रोजी पती व लहान मुलगा व मुली समावेत शिर्डी शहरात साई दर्शन झाल्यानंतर निमगाव कोराळे ग्रामपंचायत हद्दीतील प्रसाद भोजनालयासाठी हे कुटुंब गेले असता बाहेर आल्यानंतर अचानक रहस्यमय बेपत्ता झाली होती तसा मिसिगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शिर्डी पोलिसांनी विविध प्रकारे तपास करुनही मिळुन आली नाही  हे मिसीगचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे असे असताना ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात तिच्या बहीणीला सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे  

      याबाबत बेपत्ता महिलेचा पती मनोज सोनी यांनी सांगितले की शिर्डी  पोलिसांनी मेडिकल तपासणी केली असुन सोमवारी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगुन   १७तारखेला ती इंदौर येथील नंदा नगर परीसरात मोठ्या बहिणीला सापडली आहे ओळख वगैरे पटली आहे या बाबत ती इतकी वर्षे कोठे होती तीला कोणी आधार दिला ती इंदौर येथे कशी पोहचली  या बाबत मी चौकशी चा प्रयत्न केला आहे मात्र ती फार काही सांगण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याने यांचा देखील शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास केला पाहिजे असे सांगितले शिर्डी  विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी देखील शोध घेण्यासाठी  मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता मनोज सोनी यांनी माहितीच्या अधिकारात किती लोक बेपत्ता झाली आहे याची माहिती. प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती शिर्डी शहरात मानवी तस्करी होते याबाबत मोठा गाजावाजा झाला होता   या प्रश्नावर प्रसिद्धी माध्यमांनी देखील पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते आता दिप्ती सोनी हि महीला जरी सापडली असली तरी या प्रकरणाची कठोर चौकशी होऊन सत्य जनतेसमोर. आणण्यासाठी शिर्डी पोलिसांनी बारकाईने तपास करुन सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे

महिलेसह पतीची ही नार्को चाचणी करा---- जितेश लोकचंदाणी

  दिप्ती सोनी मिसीग प्रकरणात शिर्डी शहरांची मोठी बदनामी झाली न भरुण येणारी हानी झाली आहे त्याचा शिर्डी शहराच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे त्यासाठी कठोर चौकशी साठी पोलिसांनी पाठपुरावा करून सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे

Post a Comment

0 Comments