आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. क्यातनवार यांचे निधन

 संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. क्यातनवार यांचे निधन

                     संजीवनी  कुटूंबातील एक तारा निखळला.कोपरगांव प्रतिनिधी :------- देशाच्या शैक्षणिक  पटलावर विविध क्षेत्रातील उपलब्धींबाबत नावलौकिक असणाऱ्या  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार यांचे आज सकाळी (२५  डिसेंबर) ९ वाजता प्राचार्य निवासात ऋदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे  होते. त्यांच्या मागे विवाहीत मुलगी रश्मी , मुलगा प्रसन्ना असा परीवार आहे. त्यांच्या आकस्मित  जाण्याने संजीवनी शैक्षणिक  संकुल व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे.  
डाॅ. क्यातनवार यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी देश  परदेशात  माजी विध्यार्थी, माजी सहकारी, सध्याचे विध्यार्थी, कर्मचारी, संजीवनी शैक्षणिक  संकुल आणि डाॅ. क्यातनवार यांचेवर प्रेम करणारे कोपरगांवातील प्रतिष्ठित  मंडळी, त्यांचे विविध क्षेत्रातील मित्र यांच्यामध्ये पसरताच २४  डिसेंबर पर्यंत प्राचार्य पदावर पुर्ण क्षमतेने कार्यरत असलेले डाॅ. क्यातनवार यांचे खरोखरच निधन झाले का ? याची खात्री करण्यासाठी परस्परांचे  मोबाईल वाजु लागले आणि आज डाॅ. क्यातनवार आपल्यात नाही, असे जड अंतःकरणाने सांगावे लागले. 
डाॅ. क्यातनवार यांच्या निधनाची बामती समजताच जवळपासचे  कर्मचारी व इतर मंडळींनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात येवुन अनेकांनी त्यांच्या पार्थिव देहाचे साश्रु नयनांनी अखेरचे दर्शन  घेतले. यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे  शोक  व्यक्त करताना म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नावलौकिक देशात  व परदेशात  पोहचविण्यात डाॅ. क्यातनवार यांचे मोठे योगदान होते. माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे यांनी संजीवनीचा प्रत्येक विध्यार्थी, कर्मचारी व इतरही संजीवनीच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला संजीवनी परीवाराचा सदस्य म्हणुन वागविले. आज संजीवनी शैक्षणिक  समुहाच्या प्रगतीत योगदान देणारे प्राचार्य आपल्यातुन निघुन गेल्याने त्यांची उनिव नेहमीच भासणार आहे.  अंत्य दर्षनानंतर डाॅ. क्यातनवार यांचा पार्थिव देह कर्नाटक मधिल बेळगांव जवळील तिगडोळी या गावी संस्थेच्या अँब्युलन्स  मधुन पाठविण्यात आला. 
डाॅ. क्यातनवार यांनी  १९९०  मध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन  इंजिनीरिंग विभागात प्राद्यापक म्हणुन सेवेत प्रवेश  केला. पुढे ते याच विभागाचे विभाग प्रमुख झाले. निष्णात  प्राद्यापक म्हणुन ते विद्यार्थ्यांमधे  परीचित होते. सन २०१०  पासुन व्यवस्थापनाने त्यांच्यावर प्राचार्य पदाची जबाबदारी टाकली. तेव्हा पासुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने देश  पातळीवर अनेक किर्तीमान स्थापित करून व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली  संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात महत्वाची भुमिका निभावली. त्यांची  कार्य कुशलता आणि काम करण्याची व परस्परातील नाती जपण्याच्या पध्दती मुळे त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात आदराने ओळखल्या जात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र र राज्य तंत्र शिक्षणालय, आखिल भारतीय तंत्र शिक्षण  परीषद या तांत्रिक शिक्षणाशी  निगडीत संस्थांमध्येही त्यांचे सर्वांशी प्रेमाचे संबंध होते. 
संजीवनीने  डाॅ. क्यातनवार यांच्या सारखा चिरेबंदी मोहरा गमावल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीन कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे,  विश्वस्त  श्री. सुमित कोल्हे या सर्वांनी तिव्र दुःख व्यक्त केले आहे.    Post a Comment

0 Comments