कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावात घेतल्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला- सुनील गंगूले
कोपरगाव प्रतिनिधी:----- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक माजी आमदारांनी मुंबईला नेली हि बैठक आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावात घेतली व कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव कोरडे पडताच भरून देखील दिले मात्र मागील पाच वर्षात काही न करू शकणाऱ्या लोकप्रतिनिधी आपल्या बगलबच्च्याकडून करीत असलेली दिशाभूल हा खोटा कळवळा असून कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावात घेतल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन ठरल्याप्रमाणे कालव्यांना आवर्तन देखील सोडण्यात आले आहे मात्र ठरल्याप्रमाणे आवर्तन सोडण्यापूर्वीच कोपरगाव शहरातील साठवण तलाव भरण्यासाठी तातडीने डाव्या कालव्याला आमदार आशुतोष काळे यांनी सांगीतल्यामुळेच आवर्तन सोडले असून त्यामुळेच साठवण तलाव भरले. याचा विसर विरोधकांना पडला असेल मात्र शहरातील शहरातील नागरिकांना तयची जाणीव आहे. विरोधकांनी मागील पाच वर्षात काम केले असते तर आज त्यांच्यावर निवेदन देण्याची वेळ आली नसती. तेव्हा विरोधकांनी मागील पाच वर्षात काय केले त्याचे एकदा आत्मपरीक्षण करावे उगाचच नागरिकांची दिशाभूल करु नये असा उपरोधिक सल्ला देखील सुनील गंगूले यांनी विरोधकांना दिला आहे. शहरातील नागरिकांना नियमितपणे पाणी मिळावे हि आमची अपेक्षा असून आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीला पाणीपुरवठा करणारे चारही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून कोपरगाव नगर परिषदेने योग्य नियोजन करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कसा होईल यासाठी प्रयत्न करावे असे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहराच्या नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोण प्रयत्न करीत आहे हे कोपरगाव शहरातील नागरिकांना ठावूक असून त्याचा विरोधकांनी धसका घेतला आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत असतांना सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी किती बैठका घेतल्या याचे उत्तर शहरातील नागरिकांना दिले पाहिजे असे राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी म्हटले असून नगरसेवक मंदार पहाडे यांनीदेखील विरोधकांवर निशाना साधतांना ते म्हणाले कि, उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होतांना अगोदर माहिती करून घ्या नंतर विधान करा जेणेकरून नागरिकांना आपला अभ्यास कच्चा आहे याची जाणीव होऊन आपले हसू होणार नाही त्यासाठी अभ्यास करूनच वक्तव्य करण्याचा सल्ला दिला.
पाच वर्ष सत्ता असताना काहीही करू न शकलेल्या विरोधकांना शहरातील नागरिकांचा एवढा कळवळा आत्ताच कसा आला. सत्ता असतांना शहरातील नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचे योगदान न देणारे सत्तेतून पायउतार होताच टीका करतात. मग पाच वर्ष विरोधकांनी काय केले – हाजी मेहमूद सय्यद नगरसेवक
0 Comments