आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना : आमदार आशुतोष काळे

 महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय

सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना : आमदार आशुतोष काळे

कोपरगावात शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु

                     







कोपरगाव प्रतिनिधी------ कोरोना संकटात सर्व जग थांबलेले असतांना शेतकरी मात्र आपल्या शेतात राबतच होते. त्यावेळी सर्व काही ठप्प असल्यामुळे शेतातून उत्पादित झालेला शेतमाल विक्रीसाठी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागला. मागील वर्षी व यावर्षी देखील मोठ्याप्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी हिताचे निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

                    कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाकडून येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या होत्या. त्याप्रमाणे मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असून शासनाच्या निकषानुसार एफ.ए.क्यू. दर्जाची मका १८५० रुपये दराने शासन खरेदी केली जाणार आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी कर्ज माफी, अतिवृष्टी अनुदान, रखडलेले ठिबकचे अनुदान देऊन कोरोनाच्या संकटात देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे अन्यायकारक कृषी कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची पैसे मिळतील याची हमी नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही. अशा प्रकारचे चुकीचे कायदे शेतकरी हिताचे नसून केंद्र सरकारला बाजार समित्यांचे अस्तित्व संपवायचे आहे का? अशी शंका येते. शेतकऱ्यांनी मागितले नसतांना देखील नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले जात आहे. त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन अजून चिघळू न देता हे कायदे तातडीने मागे घ्यावे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

                             याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळेहरिभाऊ शिंदेविठ्ठलराव आसने,नारायण मांजरेअशोकराव काळेज्ञानेश्वर मांजरेपंचायत समिती उपसभापती अर्जुन काळेसदस्य मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटेमाजी उपसभापती राजेंद्र निकोलेमाजी सदस्य भरत बोरणारेसुधाकर गाढवेमाधवराव गोसावीदादासाहेब टुपके,सुभाषराव गाडेभाऊसाहेब शेळकेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुलेराष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटेयुवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीनगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेहाजी मेहमूद सय्यदगौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदाररोहिदास होन, विद्यार्थी शहराध्यक्ष स्वप्नील पवारमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचादिनकर खरेरमेश गवळीफकीरमामु कुरेशीबाळासाहेब रुईकरवाल्मिक लहिरे,राजेंद्र खैरनारराजेंद्र आभाळेसागर लकारेराजेंद्र वाकचौरे,मुकुंद इंगळेदिनेश पवारगणेश घुमेफिरोज पठाणव्यापारी तुषार सरोदेमहेंद्र ठक्करराजू सांगळेआप्पासाहेब सांगळे,हृषीकेश सांगळेगणी बागवानअमोल गाडेकरपप्पू पवार,आप्पासाहेब वक्तेआश्विल समदडीयाबाळासाहेब खैरनार,सनी आव्हाडसचिन लिहोटेकृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूरपरशुराम सीनगरविठ्ठल पवार,बाळासाहेब चांदगुडेमनोज थोरातशशिकांत लोखंडेसंजय जगझापप्रशांत कोपरेसंतोष मुरडनर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

        

ग्रामीण भागातील बहुतांश कोरोना बाधित रुग्णांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माल खरेदी-विक्री करतांना कोरोनाची बाधा झाली आहे.कोरोनाबाधित रुग्ण जरी कमी झाले असले तरी कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्री करताना शेतकरीव्यापारी व हमाल यांनी सोशल डिस्टसिंग पाळावे,मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

- आमदार आशुतोष काळे यांनी केले.


Post a Comment

0 Comments