२०२४ ला शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत:आमदार आशुतोष काळे
पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी------: कृषी, सहकार, कला, क्रीडा, उद्योग तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणारं नेतृत्व आजमितीला देशात दुसरं नाही. सर्वच क्षेत्रात पवार साहेबांनी आपल्या कार्य कौशल्याच्या जोरावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमवेत त्यांचे राजकारणविरहीत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सातत्याने समाजाच्या हिताचा विचार करतांना त्यांनी आयुष्यातील ५५ वर्ष देशाच्या राजकारणासाठी व्यतीत केले आहेत. आपल्या राजकीय अनुभवाच्या शिदोरीवर तीन पक्षांना एकत्रित आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून राज्यातील जनतेला विश्वास दिला. त्यांच्या या कुशल नेतृत्वातून आज त्यांच्याकडे युपीए चे अध्यक्षपद देण्याबाबत प्रमुख विरोधी पक्षामध्ये हालचाली सुरु आहे. देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरदचंद्रजी पवार यांच्याकडे असून २०२४ च्या निवडणुकीत पवार साहेब या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे अशा शब्दांत कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या आवश्यक उपाययोजना करून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शरदचंद्रजी पवार हे विचारांचा अथांग महासागर आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच झटत असतात. त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देऊन उत्साह वाढवीत असतात. कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरुपातील खोदकाम पूर्ण होण्यामागे शरदचंद्रजी पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याकडे ज्या ज्यावेळी मतदार संघातील विकासकामांचे प्रश्न घेवून गेलो त्या-त्यावेळी त्यांनी त्याबाबत तातडीने मार्ग काढले आहे. त्यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष असून भविष्यात पवार साहेबांच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करून त्यांना शतायुष्य लाभावे व २०२४ ला या देशाचे पंतप्रधान म्हणून पवार साहेबांनी विराजमान व्हावे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले. कारभारी आगवण, काका कोयटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कारभारी आगवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, जिनिंंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार पा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडियाल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, सुनील साळुंके, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.स्वप्नजा वाबळे, शहराध्यक्षा सौ.प्रतिभा शिलेदार, महिला युवती अध्यक्षा नगरसेविका सौ.माधवी वाकचौरे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, फकीरमामू कुरेशी, माजी नगरसेवक कृष्णा आढाव बाळासाहेब रुईकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद,सुधाकर दंडवते सौ.सोनाली साबळे, सौ.सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने,अनिल कदम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब बारहाते, राजेंद्र घुमरे, विठ्ठलराव आसने, काकासाहेब जावळे, ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, संजय आगवण, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, अशोक तीरसे, मीननाथ बारगळ, हरिभाऊ शिंदे, आनंदराव चव्हाण, सुनील शिंदे, सर्जेराव कोकाटे, राजेंद्र मेहेरखांब, अरुण चंद्रे, अशोकमामा काळे व संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व आजी - माजी संचालक राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 Comments