सरकार शेतकरी बांधवांन च्या अडचणी कधी समजुन घेनार.
---प्रकाश पगारे यांचा सवाल.
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:--- केन्द्र सरकार च्या क्रृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मोदी सरकार तोडगा काढण्यासाठी तयार नसल्याने त्या विरोधात राहता तालुक्यातील महाआघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वादग्रस्त कायदे रद्द करा व त्वरीत कारवाई करा या मागणीसाठी निवेदन तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले होते यावेळी सुरेश थोरात एकनाथ गोंदकर प्रकाश पगारे आदी सह राहता तालुक्यातील विविध पद अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
प्रकाश पगारे यांनी सांगितले की देशात क्रृषी कायद्याच्या जाचक अटी विरोधात मोदी सरकार बद्दल मोठ्या प्रमाणावर शेतकरी नाराज आहेत दिल्ली येथे अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू असताना केन्द्र सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नाही त्यामुळे याला अच्छे दिन कसे म्हणायचे असा सवाल त्यांनी केला आहे
पगारे म्हणाले की जर मोदी सरकार शेतकरी बांधवांनच्या आंदोलनाची दखल घेणार नसेल त्याच्या भावना समजून घेणार नसेल तर हि या सरकारची मोठी चुक ठरणार असून शेतकरी योग्य वेळी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले
यावेळी निवेदन देण्यासाठी रावसाहेब बोठे श्रीकांत मापारी सचीन चौगुले शीवाजी वर्पे अशोक आगलावे महाआघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments