गळीत हंगामात ऊस तोडणी मजुरांच्या कष्टाचे मोठे योगदान - आप्पासाहेब दवंगे
आरोग्य व कोविड तपासणी करणारा जिल्ह्यात पहिला कारखाना
![]() |
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी :--- साखर कारखानदारीत ऊस तोडणी मजुरांच्या कष्टाचे मोठे योगदान आहे. शेकडो किलोमीटर अंतरावरुन हे तोडणी मजुर आपल्या भागात ऊसतोडणी येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेवुन ऊस तोडणी कामगारांची मोफत आरोग्य व कोविड तपासणी करणारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात सर्वप्रथम पहिला कारखाना ठरला असुन या तपासणीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांनी दिली.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या गळीत हंगामात महत्वाचा घटक असलेल्या ऊस तोडणी कामगारांची सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र संवत्सर यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांची मोफत आरोग्य व कोविड तपासणी करण्यात आली याप्रसंगी आप्पासाहेब दवंगे बोलत होते.
शेतकी विभागाचे अधिकारी जी.बी. शिंदे यांनी शिबीराचे प्रास्तविक करतांना म्हणाले की, कोरोनाचे आव्हान घेवून सुरु झालेल्या गळीत हंगामात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून विविध उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशानुसार कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व ऊसतोडणी कामगार यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आरोग्य तपासणी व कोविड तपासणी करणे अनिवार्य होते. साखर आयुक्तालयाच्या सुचनांचे पालन करून कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वीच सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोफत कोविड तपासणी केली त्याचबरोबर कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जसे देशभरातील डॉक्टर यांच्यासह आशा स्वयंसेविकाही काम करत आहे. शहर असो की ग्रामीण भाग घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची व शासनाने जाहिर केलेले नियम व उपाय योजनांची माहिती देण्याचे काम देखील आशास्वयंसेविकां करत असुन त्यांना देखील नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन देखील शिंदे यांनी केले.
कारखाना आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कोपरगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते, संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिकेत खोत, डाॅ. राजेंद्र पारखे, डाॕ. रोशनी आढाव, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. अक्षय गायकवाड, डाॅ. सुवर्णा काळे कारखान्याचे संचालक फकिरराव बोरनारे, ज्ञानेश्वर परजणे, अशोक औताडे, डाॕ. मनोज बञा, सुनंदा सोनवणे यांच्यासह आशा स्वयंसेविकासह आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. तर कारखान्याचे वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले. आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे आभार सी.एन. वल्टे, आर.सी. डांगे यांनी आभार मानले.
0 Comments