Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

संजीवनीला एम. फार्मसीच्या दोन नवीन शाखांची मान्यता - श्री अमित कोल्हे.

 संजीवनीला  एम. फार्मसीच्या दोन नवीन शाखांची  मान्यता    - श्री अमित कोल्हे.

                                        


कोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये शेक्षणिक  वर्ष  २०२०-२१ पासुन एम. फार्मसीच्या स्पेशलायझेशन करीता ड्रग रेग्युलेटरी अफेयर्स व फार्मास्युटीकल बायोटक्नाॅलाजी या दोन नवीन शाखांसाठी प्रत्येकी १५ जागांची  एआयसीटीई व पीसीआय यांची मान्यता मिळाली आहे.  चालु शैक्षणिक वर्षात  या दोन नवीन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुला आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिटयूसचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.  
     पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोव्हिड १९  संबंधित सद्यस्थितीमध्ये औषधनिर्मितीसाठी लाळगणाऱ्या आवश्यक  ज्ञान असलेल्या मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे औषधनिर्माण संबधित शाखांची मागणी सतत वाढत आहे व रोजगाराच्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहेत. ड्रग रेग्युलेटरी अफेयर्स ही शाखा नवीन निर्माण होणाऱ्या औषधांच्या विविध देशात होणाऱ्या  विक्रीची मान्यता व त्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कसे राखता यते यावर प्रकाश टाकणारी शाखा असून संपूर्ण देशात अशा स्पेशलायझेशन असणाऱ्या  एम. फार्म्सची   मागणी वाढत आहे. 
            कोव्हिड १९ साठी जगभरात व्हॅक्सिन कंपन्यामध्ये होणारी चुरस व स्पर्धा सर्वांनीच अनुभवली असून फार्मास्युटीकल बायोटेक्नाॅलाॅजी  शाखेचे महत्व संपूर्ण जगाला पटलेले आहे. फार्मास्युटीकल बायोटेक्नाॅलाॅजी ही संशोधन  क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावत असून येणारा भविष्यकाळ बायोटेक्नाॅलाॅजीच्या सहायानेच  औषध निर्माण होणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.  या दोनही  शाखांचे येणाऱ्या  भविष्यातील महत्व ओळखून संजीवनीने  विध्यार्थ्यांसाठी  सुवर्णसंधी निर्माण केली आहे.  
   महाराष्ट्र राज्य प्रवेश नियंत्रण कक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रियेनुसार एम फार्मसीसाठी इच्छुक व पात्र सध्या  ऑनलाईन  नोंदणी व अर्ज सादर करणे सादर करणे बंधनकारक आहे. असे विध्यार्थी शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे विकल्प (ऑप्शन ) अर्ज सादर करून इतर शाखांबरोबरच या दोन नविन शाखांना प्रवेश  मिळवु शकतात. 
   महाविद्यालयाने नोंदणी व प्रवेश अर्ज मार्गदर्शनासाठी अत्याधुनिक सुविधा केंद्राची व्यवस्था केलेली आहे. तरी  विद्यार्थांनी  उपलब्ध सुविधेचा फायदा घ्यावा, असे श्री. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments