आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आ. आशुतोष काळेंच्या सूचनेवरून पाच नं. साठवण तलावाचे अंदाजपत्रक संदर्भात अधिकाऱ्यांकडून पाहणी

 आ. आशुतोष काळेंच्या सूचनेवरून पाच नं. साठवण तलावाचे

अंदाजपत्रक संदर्भात अधिकाऱ्यांकडून पाहणी

                            



कोपरगाव प्रतिनिधी:-----     कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत असलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाच नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण झाले आहे. यापुढील कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्नशील आहे.  त्यासाठी पाच नं. साठवण तलावाचे पुढील कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे अशा सूचना त्यांनी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेवरून सबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच पाच नं. साठवण तलावाची पाहणी केली आहे.

           कोपरगाव शहराच्या नागरिकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच नं. साठवण तलावाचे काम मार्गी लावण्याचे दिलेल्या वचनाची वचनपूर्ती निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात करून प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण केले आहे. यापुढील काम लवकरात लवकर सुरु करून पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आमदार आशुतोष काळे यांचा मानस असून त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रशांत कदमउपअभियंता विवेक शेठेसहाय्यक अभियंता मुकेश धकाते यांनी पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सोमवार (दि.८) रोजी समक्ष येवून पाच नं. साठवण तलावाची पाहणी केली आहे.

        यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणेराष्ट्रवादी काँग्रेस कोपरगावचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेसंतोष चवंडके,नगरसेवक गटनेते वीरेन बिरावकेमंदार पहाडेराजेंद्र वाकचौरेअजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदारमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,युवकअध्यक्ष नवाज कुरेशीरमेश गवळी,कृष्णा आढावमुख्याधिकारी प्रशांत सरोदेनगर अभियंता दिगंबर वाघ,पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील आदी उपस्थित होते. पाच नं. साठवण तलावाचे कामाला आमदार आशुतोष काळे यांच्याकडून चालना मिळत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

                 

Post a Comment

0 Comments