साईभक्तांंच्या सुरक्षतेसाठी शिर्डी शहरात बंदोबस्तात वाढ
डॉ दिपाली काळे यांची माहिती
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:------ वर्षं अखेर व नविन वर्ष यामुळे शिर्डी साईमंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी व कोरोणा महामारी आजार व सोशल डिस्टन्स यांची काळजी घेत सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे यांनी दिली
शिर्डी धार्मिक क्षेत्र व पर्यटन क्षेत्र असल्याने मागिल सर्व अनुभव पहाता खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात वाहन तपासणी नाकाबंदी बरोबरच सुरक्षेसाठी ८आधिकारी ११७पोलिस ३०महिला पोलीस रिझर्व पोलीस तसेच सुरक्षा दलाचे जवान २०अमलदार वाहतूक शाखेचे पोलिस यांची मदत यासाठी घेतली जाणार आहे २ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाईल साईबाबा मंदिर परिसरात देखील कायमच बंदोबस्त असतो ते देखील बारीक लक्ष ठेवणार आहे कुठल्याही परिस्थितीत साईभक्त भाविकांनची गैरसोय होणार नाही चांगल्या पद्धतीने साईबाबा चे दर्शन झाले पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल असे सांगितले
0 Comments