आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सरकारने सुरु करुन बंद केलेले मका खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करावीत - सौ स्नेहलाता कोल्हे.

 

 सरकारने सुरु करुन बंद केलेले मका खरेदी केंद्रे त्वरीत 
सुरू करावीत -  सौ स्नेहलाता   कोल्हे.






कोपरगाव  प्रतिनिधी :------  शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच ही खरेदी बंद केली असल्याने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्य शासनाने त्वरीत मका खरेदीचे केंद्र सुरू करून शेतक-यांना दिलासा दयावा,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेलहलता  कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.
कोरोना परिस्थितीत देशभर असलेल्या लाॅकडाउनमुळे राज्यातील व्यवहारही ठप्प झालेले होते, दळणवळण पुर्णपणे बंद असल्यामुळे शेतक-यांनी पिकविलेला माल विकण्यासही मर्यादा आल्या, पर्यायाने शेतक-यांना मोठया आर्थीक अडचणींचा सामना करावा लागला. आज या बिकट परिस्थितीतून सावरण्याची धडपड शेतकरी करत आहे. समाधानकारक पाउस झाल्यामुळे आर्थीक परिस्थितीवर मात करत शेतक-यांनी पीके उभी केली. पिकांच्या उत्पन्नातही वाढ झाली, त्यामध्ये मका पिकांचाही समावेश आहे. या मकांची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने सुरूवातही केली, खरेदी केंद्रावर मोठा गाजावाजा करण्यात आला, परंतु अल्पावधीत ही मका खरेदी केंद्रे बंद पडली असल्याने शेतक-यांचा भ्रमनिरास झाला. मोठया कष्टाने हाताशी आलेल्या पिकांला विकण्याची सोय राहिली नसल्याने हिरमोड झाला. त्यामुळे हे सरकार शेतक-यांच्या हितासाठी काही करणार का ? नेहमीप्रमाणे वा-यावर सोडणार ? असा सवालही सौ कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे तातडीने राज्य सरकारने मका खरेदी केंद्र सुरू करून शेतक-यांना दिलासा दयावा.

Post a Comment

0 Comments